Video: "मोदींनी ठरवलं तर पाकिस्तानी क्रिकेट..." IND vs PAK टाळण्याचा हट्ट पाकिस्तानला महागात पडणार? रमीज राजांचा इशारा चर्चत

IND vs PAK: 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.दरम्यान  माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी यावरून पाकिस्तान सरकारला मोठा इशारा दिला आहे ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 4, 2026, 02:16 PM IST
Video: "मोदींनी ठरवलं तर पाकिस्तानी क्रिकेट..." IND vs PAK टाळण्याचा हट्ट पाकिस्तानला महागात पडणार? रमीज राजांचा इशारा चर्चत

India vs Pakistan t 20 world cup 2026: पाकिस्तनी क्रिकेट बोर्डाने भारत विरुद्ध पाकिस्तन हा सामना होणार नाही असं सांगितलं आहे. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध सामना न खेळण्याच्या पाकिस्तान सरकारच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी पाकिस्तानसाठी गंभीर परिणाम होऊ शकतात, असा स्पष्ट इशारा दिला होता. 

Add Zee News as a Preferred Source

रमीज राजांचा आधीच दिलेला गंभीर इशारा

रमीज राजा यांनी यापूर्वीच सांगितले होते की भारताविरुद्ध सामने न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेटसाठी आत्मघातकी ठरू शकतो. त्यांच्या मते, आयसीसीच्या उत्पन्नाचा मोठा भाग भारतीय बाजारातून येतो आणि त्याच पैशांवर इतर देशांचे क्रिकेट बोर्ड्स, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे, अवलंबून आहेत. व्हायरल व्हिडीओत रमीज असे म्हणताना दिसतात की भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास पीसीबीची आर्थिक स्थिती इतकी ढासळू शकते की खेळाडूंना पगार देणेही कठीण होईल.

 

आयसीसीचे अर्थकारण भारताभोवती?

रमीज राजांच्या दाव्यानुसार, आयसीसीच्या एकूण कमाईपैकी सुमारे 90 टक्के हिस्सा भारतीय बाजारातून येतो. हाच निधी नंतर आयसीसी विविध क्रिकेट बोर्ड्सना वितरित करते. पाकिस्तान सरकारने वर्ल्ड कप खेळण्यास होकार दिला असला, तरी भारताविरुद्ध ठरलेल्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने आयसीसीला प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे आयसीसी हा मुद्दा सहज सोडून देईल, अशी शक्यता कमीच आहे.

भारत-पाक सामना म्हणजे मोठा व्यवसाय 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे केवळ क्रिकेट सामना नसून तो कोट्यवधींच्या कमाईचा स्रोत असतो. प्रसारण हक्क, जाहिराती, प्रायोजक आणि तिकिटविक्रीया एकाच सामन्यातून होणारी कमाई अनेकदा संपूर्ण स्पर्धेतील इतर सामन्यांच्या एकत्रित कमाईपेक्षा जास्त असते. जर पाकिस्तानने या सामन्यापासून माघार घेतली, तर प्रायोजक नाराज होऊ शकतात आणि आर्थिक भरपाईची जबाबदारी थेट पीसीबीवर येऊ शकते, जी सध्या झेलणे त्यांना कठीण ठरेल.

आयसीसीकडून कठोर कारवाईची शक्यता

पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे आयसीसीनेही कठोर भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. सामना न खेळणे हे क्रीडास्पिरिटच्या विरोधात मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत पीसीबीवर मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो, तसेच भविष्यातील आयसीसी स्पर्धांमधून पाकिस्तानला वगळले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

क्रिकेट विश्वात चर्चा आहे की हा निर्णय पाकिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडू शकतो आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतात.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More