)
India vs West Indies Live Score, 1st Test, Day1: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (2 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी जोरदार हल्ला चढवत लंचपर्यंत केवळ 90 धावांवर 5 गडी बाद केले. मोहम्मद सिराजनं जबरदस्त गोलंदाजी करत तीन विकेट्स पटकावल्या, तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजची अवस्था दयनीय झाली. अवघ्या 12 धावांवरच पहिला झटका बसला. सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉल (0) सिराजच्या चेंडूवर ध्रुव जुरेलकडून झेलबाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर जॉन कॅम्पबेल (8) बुमराहच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सिराजनं आणखी दोन विकेट्स घेतल्या. लंचपूर्वी कुलदीपनं शाई होपला बाद करून वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत पाठवला.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 मध्ये कुलदीप यादवची निवड झाली. इंग्लंड दौऱ्यावर त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. प्रसिद्ध कृष्णा, देवदत्त पडिक्कल, नारायण जगदीसन आणि अक्षर पटेल यांना या सामन्यात संधी मिळाली नाही. वेस्ट इंडिजच्या संघात माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल यांचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉलचा समावेश आहे.
यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक अथानाज, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्ह्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, जोहान लेन, जेडन सील्स.
एकूण कसोट्या – 100
भारत जिंकला – 23
वेस्ट इंडिज जिंकला – 30
बरोबरी – 47
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वेस्ट इंडिजनं मे 2002 नंतर भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.