मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी तुफान फटकेबाजी केली आहे. २० ओव्हरमध्ये टीम इंडियाने २४०/३ एवढा स्कोअर केला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन्ही ओपनरनी भारताला वादळी सुरुवात करुन दिली. रोहित आणि राहुल यांच्यात ११.४ ओव्हरमध्ये १३५ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा ३४ बॉलमध्ये ७१ रन करुन आऊट झाला, तर ऋषभ पंत शून्य रनवर माघारी परतला. केएल राहुलने ५६ बॉलमध्ये सर्वाधिक ९१ रनची खेळी केली. विराट कोहलीने २९ बॉलमध्ये नाबाद ७० रन केले. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कॉट्रेल, केसरिक विलियम्स आणि कायरन पोलार्डला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये विजय झाल्यानंतर तिरुवनंतपुरमच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी करो वा मरो अशीच आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ही मॅच खेळवली जात आहे.


वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजची कामगिरी चांगली झाली आहे. दुसरीकडे भारताला मात्र या मैदानात संघर्ष करावा लागला आहे. या मैदानात टीम इंडियाने ३ टी-२० मॅच खेळल्या यातल्या २ मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१७ साली टीम इंडियाने श्रीलंकेला ५ विकेटने पराभूत केलं होतं. २०१२ साली इंग्लंडकडून आणि २०१६ साली वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाला वानखेडेवर पराभवाचा धक्का लागला होता.


वेस्ट इंडिजच्या टीमने या मैदानात २ मॅच खेळल्या आहेत. या दोन्ही मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे. २०१६ साली वेस्ट इंडिजने या मैदानात इंग्लंड आणि भारताला हरवलं होतं.