श्रीदेवींच्या निधनाने क्रिकेट विश्वालाही धक्का, खेळाडूंना अश्रू अनावर
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी दु:खद निधन झालं. श्रीदेवींच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
नवी दिल्ली : आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी दु:खद निधन झालं. श्रीदेवींच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
खेळाडूंनी व्यक्त केला शोक
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांसोबतच भारत आणि पाकिस्तानातील क्रिकेटमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
खेळाडूंसोबत फोटो
श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांचे अनेक फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक फोटोंमध्ये श्रीदेवी क्रिकेट खेळाडूंसोबत दिसत आहेत.
सौरव गांगुलीच्या 'दादागिरी' या शोमध्ये श्रीदेवी
सोशल मीडियात व्हायरल होणारे फोटोज पाहून लक्षात येतं की, श्रीदेवींना खेळाची आवड होती. श्रीदेवींनी शेवटची मुख्य भूमिका 'मॉम' या सिनेमात केली. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी माजी खेळाडू सौरव गांगुली यांच्या 'दादागिरी' या शोमध्येही श्रीदेवी पोहोचल्या होत्या. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये आपली आवडती टीम 'बंगाल टायगर' ला सपोर्ट करण्यासाठीही श्रीदेवी पोहोचली होती.
खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली
श्रीदेवींच्या निधनानंतर भारत आणि पाकिस्तानातील क्रिकेट दिग्गजांसोबत इतरांनीही शोक व्यक्त केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त करण्यासाठी शब्द नसल्याचं म्हटलं. आम्ही सर्व श्रीदेवींना पाहत मोठे झालो, त्या आता आपल्यात नाही आणि यावर विश्वास बसत नाहीये.
१९६३ मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७ साली एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवीने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांतही काम केलं आहे. श्रीदेवीला २०१३ साली सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले.