पत्निच्या निधनाच्या 5 दिवसांनंतरच खेळाडूने घेतला जगाचा निरोप....भारताच्या 'फ्लाइंग सिख'ची love story माहिती आहे का?

Milkha singh and Nirmala kaur: भारताचा “फ्लाइंग सिख” म्हणून ओळखले जाणारे महान धावपटू मिल्खा सिंग आणि हॉलीबॉल खेळाडू निर्मला कौर या दोघांची प्रेमकहाणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.  निर्मलाजींच्या निधनानंतर केवळ पाच दिवसांनीच मिल्खा सिंग यांनी या जगाचा निरोप घेतला. जणू त्यांचं एकमेकांशिवाय जगणं अशक्यच होतं. 

Updated: Oct 16, 2025, 05:26 PM IST
पत्निच्या निधनाच्या 5 दिवसांनंतरच खेळाडूने घेतला जगाचा निरोप....भारताच्या 'फ्लाइंग सिख'ची love story माहिती आहे का?

Milkha singh: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता. 1958 साली झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर 1960 साली झाली झालेली रोमममधील ऑलिम्पिक स्पर्धा मिल्खा सिंग यांनी चांगलीच गाजवली होती. 9347 च्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत मिल्खा सिंह यांनी आपली आठ भावंडे आणि आई-वडिलांना गमावले. मिल्खा सिंह अनाथ झाले. त्यानंतर निर्वासितांच्या छावणीत खूप काळ व्यतीत केला. 

Add Zee News as a Preferred Source

ऑलिम्पिकमध्ये अद्वतीय कामगिरी
1956 आणि 1964 मध्ये ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी उत्ताम रित्या भारताचे प्रतिनिधित्व केले. 1956 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेली सर्व पदके देशाला समर्पित केली असून ही सर्व पदके जवाहर लाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे ठेवण्यात आली आहेत.

पहिल्या नजरेतलं प्रेम...
ही कहाणी सुरू झाली 1955 मध्ये कोलंबो येथे. एका उद्योगपतीने आयोजित केलेल्या डिनर पार्टीत मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली भेट झाली. पहिल्याच नजरेत मिल्खा सिंग यांना निर्मलाचं सौंदर्य आणि साधेपणा भुरळ घालून गेला. ऐन वेळी कागद नव्हता म्हणून त्यांनी तिच्या हातावरच स्वतःचा रूम नंबर लिहिल्याचं त्यांनी कित्येक मुलाखतींमध्ये सांगितलय आणि तिथूनच सुरू झालं त्यांच्या प्रेमकहाणीची पहिली पानं.

1958 मध्ये दोघे पुन्हा भेटले, आणि 1960 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये त्यांचं प्रेम फुललं. मैदानावरचा स्टार अॅथलीट आणि कोर्टवरील क्वीन, दोघेही आपल्या खेळात व्यस्त असले तरी कॉफीच्या भेटीगाठींमुळे त्यांचं नातं घट्ट होत गेलं.

शेवटी मुख्यमंत्र्यांना करवा लागला हस्तक्षेप
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांच्या प्रेमाच्या वाटेवर अडथळे आलेच. निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शीख असल्याने त्यांच्या वडिलांनी लग्नास विरोध केला. पण त्यांच्या प्रेमाच्या जोरावर पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांनी मध्यस्थी करून त्या दोघांच लग्न लाऊन दिलं.

24 मे 2021 रोजी मिल्खा यांना कोरोनामुळे मोहालीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला स्थिती नियंत्रणात होती, पण प्रकृती खालावत गेली आणि कोरोनाशी दिलेली झुंज अखेर हरली त्यांनी 18 जुन 2021 रोजी शेवटचा श्वास घेतला. मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांचं नातं केवळ पती-पत्नीचं नव्हतं, तर ते एकमेकांचे खास मित्रसुद्धा होते.

About the Author