...अन् रोहित शर्माने आपलीच 4 कोटींची Lamborghini कार फोडली; VIDEO तुफान व्हायरल

Rohit Sharma Lamborghini Car: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी माजी कर्णधार रोहित शर्मा मैदानात घाम गाळताना दिसत आहे. नुकतंच फलंदाजीचा सराव करण्यासाठी तो शिवाजी पार्क मैदानात पोहोचला होता.   

शिवराज यादव | Updated: Oct 10, 2025, 10:41 PM IST
...अन् रोहित शर्माने आपलीच 4 कोटींची Lamborghini कार फोडली; VIDEO तुफान व्हायरल

Rohit Sharma Lamborghini Car: भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून यानिमित्ताने बऱ्याच महिन्यांनी चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्याआधी कर्णधारपदावरुन काढून टाकल्याने रोहित शर्माला मोठा धक्का देण्यात आला असून, यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान यानिमित्ताने त्याच्या फलंदाजी आणि करिअरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता रोहित शर्मा या सर्व टीकांना उत्तर देण्यासाठी कसून सराव करु लागला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्मा मैदानात घाम गाळताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या 9 दिवस आधी हिटमॅन रोहित शर्माने फलंदाजीचा सराव केला. यासाठी तो शिवाजी पार्क मैदानात पोहोचला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनीही प्रचंड गर्दी केली होती. 

Add Zee News as a Preferred Source

रोहितने सराव करताना नेहमीप्रमाणे मोठे फटके खेळत आपल्या चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण चौकार, षटकार लगावण्याच्या नादात रोहित शर्माने आपलंच नुकसान करुन घेतलं. रोहित शर्माने टोलवलेला एक चेंडू थेट त्याच्या आलिशान कारवर जाऊन कोसळला. 

टीम इंडियाचा स्टार ओपनर रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही सराव करत आहे. त्याने शुक्रवारी अशाच एका सरावासाछी मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कला भेट दिली, जिथे त्याने बराच वेळ नेटमध्ये फलंदाजी केली. आपल्या फलंदाजीचं सातत्य कायम राहावं असा त्याचा प्रयत्न आहे. यादरम्यान शिवाजी पार्कवरील अनेक मुलं आणि तरुण खेळाडूंनी रोहितला पाहण्यासाठी गर्दी केली. त्याला पाहण्यासाठी मैदानाबाहेरही मोठी गर्दी जमली होती.

षटकार ठोकून फोडला कारचा आरसा

सुरुवातीला काही काळ शांतपणे फलंदाजी केल्यानंतर, रोहितने चाहत्यांना त्याची स्फोटक बाजू दाखवली आणि मोठे शॉट्स मारले. त्याचे अनेक शॉट्स मैदानाबाहेर गेले. तथापि, त्याने एक षटकार मारला ज्यामुळे त्याचंच नुकसान झालं. रोहितने मिडविकेटच्या दिशेने एक उंच शॉट मारला आणि चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. हा चेंडू रोहित शर्माच्या बाहेर उभ्या असलेल्या कारवर पडला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, एका चाहता ही रोहितचीच कार आहे असं म्हणताना ऐकू येत आहे. रोहितने आपल्या कारची विंडशिल्ड फोडली. 

दरम्यान गाडीला चेंडू लागल्याचा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो समोर आलेला नाही. मात्र चेंडू खाली पडताना व्हिडिओमध्ये मोठा आवाज ऐकू येतो. रोहित त्या दिशेने बोट दाखवतानाही दिसत आहे. 

4 कोटींची कार

रोहितची गाडी कोणती होती हे स्पष्ट नाही, परंतु सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, रोहितने त्याच्या नवीन लॅम्बोर्गिनी उरुसची विंडशील्ड फोडली. रोहितने अलीकडेच एक नवीन ऑरंड उरुस एसई खरेदी केली, ज्याची किंमत अंदाजे 4.25 कोटी आहे. रोहित अनेकदा या कारमधून प्रवास करताना दिसतो. जेव्हा तो रिलायन्स स्टेडियम किंवा इतर ठिकाणी सरावासाठी जातो तेव्हा तो ती चालवतो.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More