)
Smruti Mandhana: भारतात क्रिकेट खेळाचे लाखो चाहते आहेत. येथे तुम्हाला छोट्या गल्लीबोळ्यांपासून तर मोठमोठ्या शहरापर्यंत क्रिकेटचे चाहते दिसतील. फक्त पुरुषांच्याच नाही तर महिलंच्या क्रिकेट सामन्यांना देखील दर्शक चागंला प्रतिसाद देतात. अशातच भारतीय महिला क्रिकेटची ‘स्टार ओपनर’स्मृती मानधना हिने भारताचं नाव विश्वपटलावर न्हेल आहे. स्मृती केवळ ११ वर्षांची असताना तिची अंडर 19 संघात निवड झाली. क्रिकेटपटू स्मृतीने 10 एप्रिल 2013 रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मग तिने मागे वळून पाहिले नाही.
5 हजार धावांचा विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात मानधनाने एका वर्षात 5 हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला फलंदाज होण्याचा मान पटकावला. तिच्या या कामगिरीने भारताचा अभिमान पुन्हा एकदा उंचावला आहे. याचबरोबर तिने सर्वात कमी चेंडूंमध्ये आणि सर्वांत कमी सामन्यांत ५ हजार धावांचा टप्पा पार करून जागतिक विक्रम केला.
...नंतर दुसरी भारतीय खेळाडू
या अभूतपूर्व कामगिरीमुळे स्मृती मानधना महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ५ हजार धावा पूर्ण करणारी पाचवी फलंदाज ठरली आहे. विशेष म्हणजे, या यादीत भारताकडून हा पल्ला गाठणारी ती मिताली राजनंतरची दुसरी भारतीय खेळाडू आहे. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे स्मृती ही हा पराक्रम करणारी सर्वांत तरुण महिला फलंदाज ठरली आहे.
"क्वीन ऑफ कन्सिस्टन्सी"
केवळ आकडेवारी नव्हे, तर तिच्या फलंदाजीची शैली, आत्मविश्वास आणि मैदानावरील शांतता यामुळे ती आज जगभरातील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या प्रत्येक चौकारात आणि षटकारात भारतीय क्रिकेटचा आत्मा झळकतो. या कामगिरीनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून स्मृती मानधनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला "क्वीन ऑफ कन्सिस्टन्सी", "रेकॉर्ड गर्ल" आणि "इंडियन प्राईड" अशा विशेषणांनी गौरवले आहे.
स्मृती मानधना हिच्या या ऐतिहासिक विक्रमामुळे भारतीय महिला क्रिकेटचा झेंडा आणखी उंचावला असून, तिचं नाव क्रिकेटच्या सुवर्णपानांवर कायमच कोरलं जाईल.
FAQ
1. स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केव्हा केले?
स्मृतीने 10 एप्रिल 2013 रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
2. हजार धावा पूर्ण करणारी ती भारताची कोणती खेळाडू आहे?
स्मृती ही मिताली राजनंतर ५ हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे.
3. स्मृतीच्या या कामगिरीचे वैशिष्ट्य काय आहे?
ती ५ हजार धावा पूर्ण करणारी सर्वांत तरुण महिला फलंदाज आहे आणि तिची फलंदाजी शैली, शांतता आणि आत्मविश्वास यामुळे ती युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान आहे.