Virat Kohli met his childhood lookalike: 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरोधातील तीन सामन्यांची मालिका सुरु होत आहे. कसोटी आणि टी-20 आणि कसोटीमधून निवृत्ती घेतलेला विराट कोहली या मालिकेसाठी जोरदार तयारी करत असून, कोणतीही कसर सोडत नाही आहे. 37 वर्षीय अनुभवी फलंदाज नेटमध्ये कसून सराव करत आहे. एकदिवसीय वर्ल्डकप खेळायचा असल्यास विराट कोहलीला आपला फॉर्म कायम ठेवावा लागणार आहे. भारतासाठी खेळलेल्या शेवटच्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने दोन शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली आहे. न्यूझीलंडविरुद्धही हीच कामगिरी पुढे चालू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
तथापि, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तयारीसाठी विराट कोहली वडोदरा येथे पोहोचला होता. यावेळी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याचं कारण व्हिडीओत एक चिमुरडा दिसत आहे, जो हुबेहुब विराट कोहलीप्रमाणे दिसत आहे. विराट कोहली लहानपणी दिसायचा अगदी तसाच हा चिमुरडा दिसत असल्याने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
विराट कोहलीने प्रशिक्षण सत्रातून वेळ काढून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांना ऑटोग्राफ दिले. त्याच वेळी एका लहान चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, कारण तो कोहलीच्या बालपणाप्रमाणे हुबेहूब दिसत होता.
Not Virat Kohli even chotu Virat Kohli have own AURA. pic.twitter.com/goi98SJwBM
— Sam (@Cricsam01) January 10, 2026
विराट कोहली फोटो आणि व्हिडिओंमध्ये मुलांशी संवाद साधताना दिसत होता. विराट कोहलीला आपल्यातील साम्या पाहून गंमत वाटत असल्याचं फोटोत दिसत आहे.
या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. अनेक चाहते त्या लहान मुलाला 'मिनी कोहली' म्हणत आहेत. अनेक युजर्सनी विराट कोहलीचे जुने फोटो शेअर करत दोघांची तुलना केली आहे.
Virat Kohli giving autograph to his younger version. pic.twitter.com/0mlfmd7F5T
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 9, 2026
एका युजरने कमेंट करताना '19-20 चाही फरक नाही' असं म्हटलं आहे. तसंच एकाने खरंच एकदम सेम टू सेम अशी कमेंट केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यानंतर, कोहलीने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दिल्लीकडून खेळताना एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. 6 जानेवारी रोजी रेल्वेविरुद्धच्या सामन्यातही तो खेळेल अशी अपेक्षा होती, परंतु शेवटच्या क्षणी तो त्या सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, कोहली 2027 च्या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या दौऱ्यावर जाऊ शकेल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते. तथापि, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधील अपयशानंतर, कोहलीने जोरदार पुनरागमन करत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली.
कोहलीने रोहित शर्मासोबत एक सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसरी रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशा दोन शतकी भागीदारीही केल्या. ही जोडी ब्लॅककॅप्सविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांमध्ये आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडविरुद्धचे तीन एकदिवसीय सामने 11, 14 आणि 18 जानेवारी रोजी वडोदरा, राजकोट आणि इंदूर येथे खेळले जातील.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.