)
Indian team jersey for Asia Cup 2025 Revealed: आशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी अखेर चाहत्यांसमोर आली आहे. संघातील स्टार ऑलराउंडर शिवम दुबेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत या जर्सीची पहिली झलक दाखवली. भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या आशिया कपमध्ये जर्सीवर कोण स्पॉन्सर कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष होते. ड्रीम११ चा बीसीसीआयसोबतचा करार संपल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे.
शिवम दुबेने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोंमध्ये तो भारतीय संघाची नवी जर्सी परिधान केलेला दिसतो. जर्सीवर बीसीसीआयचा लोगो आणि आशिया कप 2025ची छाप असली तरी स्पॉन्सरच्या जागा रिक्त आहे. आतापर्यंत ड्रीम 11 हा मुख्य स्पॉन्सर होता, मात्र केंद्र सरकारच्या 'ऑनलाईन गेमिंग संवर्धन आणि विनियमन अधिनियम 2025'नंतर या कंपनीला स्पॉन्सरशिपमधून हटवण्यात आलं.
आता बीसीसीआयने नव्या स्पॉन्सरसाठी टेंडर काढलं असून, बोली लावण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर ठरवली आहे. यावेळी स्पष्ट अट घालण्यात आली आहे की, कोणतीही कंपनी किंवा तिचा गट ऑनलाईन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगाराशी संबंधित नसावा.
टीम इंडियाची कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे, तर शुभमन गिल उपकर्णधार असेल. संघात आयपीएल व घरगुती क्रिकेटमधून चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक तरुणांना संधी मिळाली आहे.
भारताला आशिया कप 2025 ची यजमानी मिळाली असली तरी भारत-पाकिस्तान तणावामुळे स्पर्धा न्यूट्रल व्हेन्यू यूएईत होणार आहे. ग्रुप-ए मध्ये भारतासोबत पाकिस्तान, यूएई आणि ओमान या संघांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळला जाणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह.
उ. – एशिया कपच्या काही दिवस आधी, खेळाडू शिवम दुबेने सोशल मीडियावर फोटो शेअर करून जर्सीची झलक दाखवली.
उ. – जर्सीवर बीसीसीआयचा लोगो आणि ‘Asia Cup 2025’ छापलेलं आहे. मात्र मुख्य स्पॉन्सरचं नाव गायब आहे.
उ. – आतापर्यंत Dream11 हा मुख्य स्पॉन्सर होता. पण केंद्र सरकारच्या “ऑनलाईन गेमिंग संवर्धन व विनियमन अधिनियम 2025”नंतर त्याला स्पॉन्सरशिपमधून काढण्यात आलं.
उ. – बीसीसीआयने नवा स्पॉन्सर शोधण्यासाठी टेंडर काढलं आहे. अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2025 आहे.
उ. – कोणतीही कंपनी किंवा तिचं नेटवर्क ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगाराशी जोडलेलं नसावं.