Indian Women Cricket Team Biggest Win: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी इतिहास रचला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 304 धावांनी पराभव केला. महिला क्रिकेटमधील हा खूप मोठा रेकॉर्ड आहे. एकीकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ 200 धावा पार करतानाही संघर्ष करताना दिसला असताना दुसरीकडे महिला क्रिकेट संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली.
असं पहिल्यांदाच झालं आहे, जेव्हा भारतीय संघाने 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. याआधी भारतीय संघाच्या नावे 249 धावांनी सामना जिंकल्याच्या रेकॉर्डची नोंद होती. 2017 मध्ये आयर्लंडच्याच विरोधात त्यांनी हा रेकॉर्ड केला होता.
Smiles all around!
Scenes right after #TeamIndia sealed a 3-0 series win over Ireland
Scorecard https://t.co/xOe6thhPiL#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WDUkJSj3x4
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
या विजयासह भारतीय संघाने आयर्लंडला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. भारताने तिसऱ्या सामन्यात 5 गडी गमावत 435 धावा केल्या, जो घरच्या मैदानावर भारतीय संघाचा सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आहे.
भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला क्रिकेट संघाने यावेळी आपली सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली तसंच पहिल्यांदा 400 चा आकडाही पार केला. याआधी 12 जानेवारीला महिला संघाने 370 धावा करत सर्वाधिक धावांची नोंद केली होती.
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौरच्या जागी कर्णधारपद भूषवणाऱ्या मंधानाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावलं. हे तिचं 10 वं शतक आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद शतक ठोकण्याचा हरमनप्रीत कौरचा विक्रम स्मृती मंधानाने मोडला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक शतकं करणारी स्मृती चौथी क्रिकेटपटू ठरली आहे. राजकोट येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने आयर्लंडविरुद्ध अवघ्या 70 चेंडूत शतक झळकावलं, तिने 80 चेंडूत 135 धावा केल्या, ज्यामध्ये तिने 7 षटकार आणि 12 चौकार ठोकले. यापूर्वी हरमनप्रीत कौरने गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत शतक ठोकून हा विक्रम केला होता.
2017 पासून हा विक्रम हरमनप्रीतच्या नावे आहे, एकदिवसीय विश्वचषकात डर्बी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत शतक ठोकलं होतं. स्मृतीचे 70 चेंडूत शतक हे महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील संयुक्त सातवे सर्वात जलद शतक आहे. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रम मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 45 चेंडूत शतक ठोकलं होतं.
स्मृती व्यतिरिक्त, सलामीवीर प्रतिका रावलनेही 129 चेंडूत 154 धावांची शानदार खेळी केली. तिने 20 चौकार आणि 1 षटकार मारला. प्रतिकाचे हे पहिले एकदिवसीय शतक आहे. प्रतीका रावलने आतापर्यंत सहा एकदिवसीय डावांमध्ये 74 च्या सरासरीने 444 धावा केल्या आहेत.
या सामन्यात प्रतिका आणि कर्णधार मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 26.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनेही 59 धावांची शानदार खेळी केली.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
IND
213/4(20 ov)
|
VS |
SA
37/3(4.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.