नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात सुरु झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकन बॉलर्सने टीम इंडियाला १७२ रन्सवर ऑल आऊट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून केवळ चेतेश्वर पुजारा यानेच श्रीलंकन बॉलर्सला काही प्रमाणात टक्कर दिली. तसेच, शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी चांगली बॅटींग केल्यामुळे टीम इंडियाचा स्कोर वाढण्यास काही प्रमाणात मदत झाली.


या इनिंगमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरोधात बॅटिंग करताना असे काही रेकॉर्ड बनवले आहेत जे कुणालाच लक्षात ठेवायला आवडणार नाही. एक नजर टाकूयात या रेकॉर्ड्सवर...


१२ वर्षांनंतर सर्वात कमी स्कोर:


टीम इंडियाने या मॅचमध्ये १७२ रन्स करत ऑल आऊट झाली. हा स्कोर टीम इंडियाचा १२ वर्षांतील आपल्या घरच्या मैदानात सर्वात कमी स्कोर आहे. यापूर्वी चेन्नईत २००५ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात १६७ रन्सचा स्कोर केला होता. त्या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता.


दुसरा सर्वात कमी स्कोर:


७ वर्षांनंतर एखाद्या टेस्ट मॅचच्या इनिंगमध्ये टीम इंडियाने ५० रन्स करण्यापूर्वीच ५ विकेट्स गमावले. यापूर्वी २०१० मध्ये न्यूझीलंडविरोधात खेळताना अहमदाबादमध्ये टीम इंडियाने हा स्कोर बनवला होता.


सुरंगा लकमलने बनवला मेडन ओव्हरचा रेकॉर्ड:


या मॅचमध्ये श्रीलंकन बॉलर असलेल्या सुरंगा लकमल याने एक अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. लकमलने ११ ओव्हरच्या बॉलिंगमध्ये ९ ओव्हर्स मेडन टाकल्या. ११ ओव्हर्समध्ये त्याने केवळ ५ रन्स दिले तर ३ विकेट्स घेतले. लकमलने सलग ४६ असे बॉल्स टाकले ज्यावर भारतीय बॅट्समनला एकही रन करता आला नाही.


यापूर्वी टीम इंडिया विरोधात मेडन ओव्हर टाकण्याचा रेकॉर्ड चामिंडा वास याच्या नावावर होता. त्याने २००५ मध्ये सलग ११ मेडन ओव्हर टाकले होते.


केएल राहुल शुन्यावर आऊट:


कोलकाताच्या ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लोकेश राहुल शून्यावर आऊट झालाय. सुरंगा लकमलच्या बॉलवर लोकेश आऊट झाला. या मॅचमध्ये लोकेश राहुल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. टेस्ट मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर आऊट होणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरलाय.


विराट कोहलीला ग्रहण:


सध्या फॉर्मात असलेला कॅप्टन विराट कोहलीने आपल्या नावावर एक विचित्र रेकॉर्ड बनवला आहे. एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणारा कॅप्टनचा रेकॉर्ड कोहलीने बनवला आहे. एका वर्षात शू्न्यावर आऊट होण्याचा रेकॉर्ड यापूर्वी कपिल देव याच्या नावावर होता. कपिल देवने १९८३ साली पाच वेळा शून्यावर आऊट होण्याचा रेकॉर्ड केला होता.