मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी| पहिल्याच सामन्यापूर्वीच 2 मॅच विनर्स 'आऊट'

चाहत्यांची निराशा, रोहित शर्मा ऐवजी पोलार्ड कॅप्टन, CSK ने टॉस जिंकला 

Updated: Sep 19, 2021, 07:42 PM IST
मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी| पहिल्याच सामन्यापूर्वीच 2 मॅच विनर्स 'आऊट' title=

दुबई: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवातीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा रंगणार आहे. दोन टफ संघ एकमेकां विरुद्ध मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. रोहित शर्मा खेळत नसून मुंबई संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. 

महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. किरोन पोलार्डकडे या सामन्याचे नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहित शर्मा कर्णधारपदी का नाही याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. MI विरुद्ध CSK चा सामना दुबई इंटरनेशनल स्टेडियम UAE इथे होत आहे. 

कॅप्टन कूल धोनीचा ट्रेनिंग सेशनमधील 8 षटकार मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहिल्या टप्प्यात धोनीला खूप खेळताना पाहायला मिळालं. आता दुसऱ्या टप्प्यात धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसेल अशी आशा आहे.  आयपीएल 2021 चा पहिला टप्पा कोरोनाव्हायरस संसर्गामुळे 4 मे रोजी स्थगित करण्यात आला होता.

दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. आता दुबईमध्ये दुसऱ्या टप्प्याचा श्रीगणेशा MI vs CSK संघ करणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील शेवटचा सामना आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या बॉलपर्यंत 219 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून रोमांचक विजय मिळवला. पहिल्या टप्प्यातील बदला घेण्यासाठी आता CSK तयार आहे. 

आयपीएल सामने Live कुठे पाहता येणार

डिज्नी +हॉटस्टारचे वेगळे सबस्क्रिप्शन घेऊनही सामन्यांचा आनंद घेऊ शकता. डिज्नी + हॉटस्टार व्हीआईपी पॅक आहेत ज्यांची सदस्यता एकावर्षासाठी 399 रुपये आहे.