IPL 2021: स्टेडियममधील पंजाब किंग्जच्या कपड्यातील ही स्त्री आणि गोंडस बाळ कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

स्टेडियम मधून एक फोटो समोर आला आहे, ज्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये एक स्त्री, आपल्या गोंडस मुला सोबत आहे.

Updated: Apr 17, 2021, 08:10 PM IST
IPL 2021: स्टेडियममधील पंजाब किंग्जच्या कपड्यातील ही स्त्री आणि गोंडस बाळ कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई : पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी आठवा सामना खेळला गेला आहे. या स्टेडियममध्ये दोन्ही संघांनी आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात पंजाबच्या संघाला 100 धावा सुद्धा करणे खूप कठीण झाले होते. पण अखेर पंजाबने 106 धावांचा पल्ला गाठला. या सामन्यामुळे सोशल मीडियावरही वातावरण तापले आहे. दरम्यान, स्टेडियम मधून एक फोटो समोर आला आहे, ज्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये एक स्त्री, आपल्या गोंडस मुला सोबत आहे. एकीकडे काही लोक या फोटोचे कौतुक करत आहेत, तर काही लोक ट्रोल देखील करत आहेत.

आयपीएल सामना आहे आणि स्टेडियममधून काही मजेशीर बाहेर आलं नाही. असे होणार नाही. आयपीएलमुळे चाहत्यांना अनेक गोसिप्स मिळाले आहेत. आता सध्या लहान मुलाला उचलून घेतलेल्या आणि पंजाब किंग्जची जर्सी घातलेल्या या स्त्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोने अनेक लोकांची मनं जिंकली आहेत. आता तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की, हे दोघे कोण आहेत?

हा फोटो पंजाब किंग्जचा खेळाडू मनदीप सिंगच्या मुलाचा आणि पत्नीचा आहे. दोघेही सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर आले होते.

या फोटोला आयपीएलच्या ऑफिशीयल अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आले आहे आणि त्यावर एक गमतीदार कॅप्शन देखील देण्यात आला आहे. 'जूनीयर मनदीप सिंग हा अपल्या वडिलांना चेअर्स करण्यासाठी आला आहे.'

हा फोटो सोशल मीडियावर टाकताच तो खूप व्हायरल झाला आहे. काही लोक या फोटोचे खूप कौतुक करत आहेत, तर काही लोक कोरोनामुळे त्यांनी स्टेडियममध्ये येऊ नयेत अशी टीका देखील केल्या आहेत.