पुणे :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (royal challengers bangalore) मुंबई इंडियन्सवर (mumbai indians) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावाचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये  3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला. (ipl 2022 rcb vs mi royal challengers bangalore win by 7 wickets against mumbai indians at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुकडून युवा अनुज रावतने सर्वाधिक 66 धावांची महत्तवपूर्ण खेळी केली. या 47 बॉलमध्ये त्याने 2 फोर आणि 6 खणखणीत सिक्स ठोकले. या शिवाय विराट कोहलीने 36 बॉलमध्ये 5 चौकारासंह 48 रन्सचं योगदान दिलं. मुंबईकडून जयदेव उनाडकट आणि डेवाल्ड ब्रेविस या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 


दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले. मुबंईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सने गमावून 151 धावा केल्या.  सूर्यकुमारने सर्वाधिक 68 धावांची नाबाद खेळी केली.


आरसीबी प्लेइंग इलेव्हन :  फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, वनिंदु हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.  


मुंबई इंडियंसची 'पलटण' :  रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरोन पोलार्ड, रमनदीप सिंह, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी.