मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 30 वा सामना (IPL 2022) राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात राजस्थानचा ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) धमाका केला आहे. बटलरने या मोसमातलं दुसरं शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे जॉसने 90 मीटर लांब खणखणी सिक्स खेचत शतक पूर्ण केलं. बटलरच्या आयपीएल कारकिर्दीतील हे एकूण तिसरं शतक ठरलंय. (ipl 2022 rr vs kkr rajsthan royals opener jos buttler scored century against kolkata knight riders at brabourne stadium mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉसने 59 बॉलमध्ये 9 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर 2 बॉल खेळून तो आऊट झाला. जॉसने एकूण 103 धावांची खेळी केली. 


दरम्यान जॉसने याआधी या मोसमात मुंबई इंडियन्स विरुद्ध या मोसमातील वैयक्तिक आणि एकूण पहिलंवहिलं शतक ठोकलं होतं. तेव्हा जॉसने एकूण 66 चेंडूत हे शतक पूर्ण केलं.


कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन : 


एरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, आंद्रे रसल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती. 


राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन : 


जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मकॉए, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.