Joe Root Rajasthan Royals: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडत आहे. अशातच आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. (IPL 2023 Auction England batter Joe Root finally bag an contract with the Rajasthan Royals marathi news)
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला (Joe Root) पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात विकत घेण्यात आलं आहे. आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जो रूटला (Joe Root) आयपीएलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या लिलावात जो रूटला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने 1 कोटी रुपयांना विकत घेतलंय. त्यामुळे आता आयपीएलमध्ये देखील जो रूटची जादू पहायला मिळणार आहे.
Took you long, but welcome to the @IPL, Joe Root! @rajasthanroyals picks the former England captain for 1 cr.#IPLAuction #TATAIPLAuction #TATAIPLAuctionOnJioCinema #AuctionFreeOnJioCinema pic.twitter.com/DzWNPRHruA
— JioCinema (@JioCinema) December 23, 2022
इंग्लंडचा आणखी एक स्टार खेळाडू सॅम करनला (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. तर 23 वर्षीय इंग्लंडच्या फलंदाज हॅरी ब्रूक्सला सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) तब्बल 13 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले आहे.
दरम्यान, चालू हंगामात मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) हा भारताचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. मयांकला लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) संघानं आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. लिलावात सर्वाधिक रक्कम ही विदेशी खेळाडूंना मिळाल्याचं दिसून आलंय. कॅमेरून ग्रीनला (cameron green) मुंबई इंडियन्सच्या (MI) संघाने 17.50 कोटी रुपयांच्या रकमेवर संघात सामील करता आलं आहे.