IPL 2023, MI vs CSK: मुंबईशी भिडण्याआधी चेन्नईला मोठा झटका; धोनीच्या 'ब्रम्हास्त्र'ला दुखापतीचं ग्रहण!

Mumbai Indians vs Chennai Super Kings: शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर (IPL 2023) सराव सत्रानंतर स्टोक्सची टाच दुखत होती आणि त्याला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता बेन स्टोक्स (Ben Stokes) खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 8, 2023, 04:13 PM IST
IPL 2023, MI vs CSK: मुंबईशी भिडण्याआधी चेन्नईला मोठा झटका; धोनीच्या 'ब्रम्हास्त्र'ला दुखापतीचं ग्रहण! title=
IPL 2023 Ben Stokes

Ben Stokes, IPL 2023: शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) या पारंपारिक विरोधी संघाचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळवला जाईल. अशातच धोनीचं (MS Dhoni) टेन्शन वाढलंय. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) शनिवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या होणाऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत संशय व्यक्त केला जातोय. (IPL 2023 Ben Stokes in doubt for Mumbai Indians vs Chennai Super Kings game due to Heel pain)

Ben Stokes याला काय झालंय?

स्टोक्सला शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सराव सत्रानंतर टाच दुखत होती आणि त्याला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता बेन स्टोक्स खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. चेन्नईचा संघ अंतिम निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. त्यामुळे आता चेन्नईच्या संघाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान, बेन स्टोक्स याला खरेदी करण्यासाठी सीएसकेने आयपीएल लिलावात 16.25 कोटी रुपये खर्च केलं होतं. एमएस धोनीच्या जागी स्टोक्सला संभाव्य कॅप्टन म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे आता आत्ताच स्टोक्सच्या दुखापतीमुळे चेन्नईचं भविष्य अंधारत तर नाही? अशी चर्चा रंगल्याचं दिसतंय.

कसा असेल मुंबईचा संघ? (MI Probable XI)

रोहित शर्मा (C), इशान किशन (WC), सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान.

आणखी वाचा - Suryakumar yadav:"सूर्यकुमार हा अँड्र्यू सायमंड्ससारखा, खराब फॉर्ममध्ये...", बड्या खेळाडूने दिला 'हा' मोलाचा सल्ला!

कसा असेल चेन्नईचा संघ? (CSK Probable XI)

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, आरएस हंगरगेकर.