IPL 2023 Players Auction Final List: बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या TATA IPL 2023 Player Auction साठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली. यंदाच्या मिनी लिलावात (IPL Mini Auction) एकूण 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यात 273 भारतीय खेळाडूंचा तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. ()
आयपीएल 2023 च्या (IPL 2023) लिलावात 10 फ्रँचायझींकडे फक्त 87 स्लॉट शिल्लक आहेत, म्हणजेच सर्व 10 संघ 87 खेळाडू खरेदी करतील. यावेळी एकूण 19 खेळाडू आहेत ज्यांची सर्वात जास्त मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे, ते सर्व परदेशी आहेत, त्यात फक्त दोन भारतीय खेळाडू आहेत. हे दोन खेळाडू असे आहेत. ज्यांना टीम इंडियामधून (Team India) डावललं गेलं.
NEWS : TATA IPL 2023 Player Auction list announced. #TATAIPLAuction
Find all the details https://t.co/fpLNc6XSMH
— IndianPremierLeague (@IPL) December 13, 2022
मनीष पांडे (Manish Panday) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) हे दोन खेळाडू यंदा करोडोमध्ये खेळणार हे आता पक्कं झालंय. IPL 2023 पूर्वी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मयंक अग्रवालला कर्णधारपदावरून हटवलं होतं. त्यानंतर आता मयंक कोणत्या संघाकडून खेळणार (IPL 2023 Players Auction) याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, 11 खेळाडुंनी दीड कोटी रुपये बेस प्राइज (Base prize) दिल्यात आली आहे. मागील आयपीएल हंगामात मनीष पांडे (Manish Panday) लखनऊ सुपर जायंट्स टीमचा (LSG) भाग होता. मात्र, खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलंय. मनीष पांडेने टीम इंडियासाठी आतापर्यंत 39 T-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर आता त्याचा कोणता संघ खरेदी करणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय.