IPL 2023 Prize Money : इंडियन प्रीमिअर लीग 2023 चा (IPL 2023) शेवटचा सामना आज गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (narendra modi stadium) खेळवला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात हा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या आयपीएल फायनलकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या सामन्यानंतर पैशांचा पाऊस पडणार आहे हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यानंतर गुजरातला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. तर चेन्नईच्या संघाकडे पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. दुसरीकडे, आयपीएल ही जगातील सर्वाधिक कमाई करुन देणारी करणारी टी-20 क्रिकेट लीग आहे. त्यामुळे विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. विजेत्या संघासह पराभूत संघाला, तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंनी किती रक्कम मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.


स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण बक्षिसांची रक्कम ही 46.5 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला सर्वाधिक म्हणजे 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सलाही 6.5 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.


तर आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला (ऑरेंज कॅप) आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला (पर्पल कॅप) प्रत्येकी 15 लाख रुपये आणि इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट असलेल्या खेळाडूला 20 लाख रुपये मिळणार आहेत. यासोबतच, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन, सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम तसेच गेम चेंजर ऑफ द सीझन खेळाडूला प्रत्येकी 12 लाख रुपये मिळणार आहेत.


अशी वाटली जाणार बक्षिसाची रक्कम


विजेता संघ - 20 कोटी


उप विजेता संघ - 13 कोटी


मुंबई इंडियन्स  - 7 कोटी


लखनऊ सुपर जायंट्स - 6.5 कोटी


Emerging Player of the tournament: 20 लाख


Orange Cap: 15 लाख


Purple Cap: 15 लाख


Most Valuable Player: 12 लाख


Power Player of the Season: 15 लाख


Super Striker of the Season: 15 लाख


Game Changer of the Season: 12 लाख


शुभमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरण्याची शक्यता


शुभमन गिल (गुजरात टायटन्स) – 851 धावा
फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) - 730 धावा
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 639 धावा
डेव्हॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्स) – 625 धावा
यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स) – 625 धावा


पर्पल कॅपसाठी गुजरातच्या खेळाडूंमध्येच चढाओढ


मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) - 28 विकेट्स
राशिद खान (गुजरात टायटन्स) - 27 विकेट्स
मोहित शर्मा (गुजरात टायटन्स) - 24 विकेट्स
पियुष चावला (मुंबई इंडियन्स) – 22 विकेट्स
युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) – 21 विकेट्स