IPL 2025 : IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी बीसीसीआयने नवीन पॉलिसी लागू केली आहे. नव्या पॉलिसीमध्ये अनेक नवीन नियम जोडले गेले असून यामध्ये सांगितल्या गेल्यानुसार खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य, प्रॅक्टिस सेशन किंवा सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मात्र हेच नियम आता बीसीसीआयसाठी (BCCI) डोकेदुखी बनले आहेत. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने (Virat Kohli) बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबासाठी लागू केलेल्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मोहित शर्माने (Mohit Sharma) सुद्धा या नियमाचा विरोध केला आहे.
ANI च्या माहितीनुसार मोहित शर्माने बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबावर लावलेल्या नव्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली. मोहित शर्मा म्हणाला की, 'काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. आपल्या सर्वांचे व्यक्तिगत विचार वेगवेगळे असू शकतात. हे गरजेच आहे की आम्ही त्या गोष्टींवर लक्ष देऊ ज्यावर आमचं नियंत्रण आहे. कुटुंबाची उपस्थिती वाईट गोष्ट कशी काय असू शकते?'.
BCCI च्या नव्या नियमाबाबत विराट कोहली म्हणाला होता की, 'कुटुंब जवळपास असल्याने खेळाडूंना मैदानातील निराशेतून लवकर उभारी मिळण्यास मदत होते. मी माझ्या खोलीत एकटा जाऊन उदास बसू इच्छित नाही. मला सामान्य व्हायचे आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या खेळाला एका जबाबदारीप्रमाणे समजू शकता. मला या निर्णयामुळे खूप निराशा वाटली कारण ज्यांचं याबाबतीत काही देणंघेणं नव्हतं अशांना सुद्धा या चर्चेत सामील करण्यात आलं. जर तुम्ही कोणाही खेळाडूला विचारलं की तुम्हाला तुमचं कुटुंब तुमच्या सोबत हवंय का? तर सर्व खेळाडू होत म्हणतील'.
हेही वाचा : वडील चालवायचे टेम्पो, भावाने स्वतःच जीवन संपवलं, 'या' गोलंदाजाला अचानक मिळावी IPL 2025 खेळण्याची संधी
मोहित शर्मा आयपीएलचे मागील काही सीजन गुजरात टायटन्सचा भाग होता. मात्र मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आले. आयपीएल 2025 रोजी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटींना खरेदी केलं. मोहितने मागील दोन सीजनमध्ये आयपीएलमध्ये एकूण 40 विकेट घेतले आहेत. त्यामुळे आतासुद्धा दिल्लीला त्याच्याकडून अशाच चांगल्या खेळाची अपेक्षा असेल.