IPL 2025: 'धोनी आता फक्त ब्रँड म्हणून खेळतोय, त्याने खरं तर....', मांजरेकर स्पष्टच बोलले, 'फलंदाजीसाठी इतका...'

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2023 मध्ये चेन्नई संघाचं कर्णधारपद सोडून दिलं   

शिवराज यादव | Updated: Mar 30, 2025, 07:22 PM IST
IPL 2025: 'धोनी आता फक्त ब्रँड म्हणून खेळतोय, त्याने खरं तर....', मांजरेकर स्पष्टच बोलले, 'फलंदाजीसाठी इतका...'

IPL 2025: चेपॉकच्या मैदानात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) 50 धावांनी चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) पराभव केला. या सामन्यात धोनीने  स्फोटक फलंदाजी केली. पण धोनी चक्क नवव्या क्रमांकावर खेळायला आल्याने चेन्नईचे चाहते नाराज झाले. धोनीने 16 चेंडूत 30 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पण धोनीच्या या खेळीचा संघाला काही फायदा झाला नाही. बंगळुरुने समोर 197 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना चेन्नई संघ 20 ओव्हरमध्ये फक्त 146 धावा केल्या.

Add Zee News as a Preferred Source

संजय मांजरेकरने धोनीसंबंधी मांडंल स्पष्ट मत

सामन्यासंबंधी बोलताना संजय मांजरेकरने धोनीच्या संघातील भूमिकेवर मत मांडलं. धोनीची भूमिका धावांमध्ये आपलं योगदान देणं नव्हे तर फक्त ब्रँड व्हॅल्यू म्हणून आहे असं परखड मत त्याने मांडलं. 

"मी जरा मोठा दृष्टीकोनातून पाहत आहे. जर तुम्ही या हंगामात किंवा गेल्या हंगामातील धोनीची खेळी पाहिली तर फलंदाज कमी आणि ब्रँड म्हणून जास्त खेळत आहे. जेव्हा चेन्नई संघ प्लेईंग 11 निवडतो तेव्हा ते महेंद्रसिंग धोनी असल्याने अतिरिक्त फलंदाज निवडत नाहीत. त्यांच्यासाठी धोनी म्हणजे बोनस आहे. त्याची वेगळी भूमिका आहे," असं संजय मांजरेकरने म्हटलं आहे.

पुढे त्याने म्हटलं की, "म्हणूनच कदाचित महेंद्रसिंग धोनी खेळत आहे आणि फलंदाजीसाठी इतका उशिरा येत आहे. त्याने कर्णधारपदी राहायला हवं. तो विकेटकिपर म्हणून चांगली कामगिरी करत आहे. पण तो कर्णधार म्हणून जास्त योगदान देऊ शकेल. सध्या त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही".

2023 च्या आयपीएल जेतेपदानंतर धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडलं आणि 2024 च्या हंगामापूर्वी त्याने ही जबाबदारी सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. तरीही, डीआरएस निर्णय घेण्याच्या बाबतीत किंवा गायकवाडला अपीलसाठी सल्ला देण्याच्या बाबतीत तो अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये मुख्य खेळाडू आहे.

आरसीबी विरुद्ध धोनीच्या नाबाद खेळीने गरज पडल्यास सीएसकेसाठी अधिक महत्त्वाची भूमिका बजावण्यास तंदुरुस्त असल्याचं त्याने दाखवून दिलं. तसंच धोनीसारख्या चांगल्या पॉवर-हिटिंग क्षमतेच्या खेळाडूला सीएसकेसाठी वरच्या क्रमावर बढती दिली पाहिजे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More