जिंकताना धोनी वर फलंदाजीला येतो गरज असताना 9 व्या क्रमांकावर! चाहते संतापले; हर्षा भोगलेही म्हणाले..

Dhoni At Number 9: चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुच्या संघाने तब्बल 17 वर्षानंतर पराभूत केलं. या सामन्यामध्ये चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 29, 2025, 07:34 AM IST
जिंकताना धोनी वर फलंदाजीला येतो गरज असताना 9 व्या क्रमांकावर! चाहते संतापले; हर्षा भोगलेही म्हणाले..
सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Dhoni At Number 9: चेन्नईमधील चेपॉकच्या स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सामन्यामध्ये बंगळुरुच्या संघाने तब्बल 17 वर्षानंतर चेन्नईला घरच्या मैदानावर धूळ चारली. या सामन्यामधील चेन्नईच्या पराभवापेक्षा सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा चक्क नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. हा सामना चेन्नईने 50 धावांनी गमावला. 197 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. 

Add Zee News as a Preferred Source

43 बॉलमध्ये 98 धावांची गरज असताना धोनी आलाच नाही

शिवम दुबे सामन्यातील 13 व्या ओव्हरा बाद झाला. चेन्नईला विजयासाठी 43 बॉलमध्ये 98 धावांची गरज असताना धोनी फलंदाजीसाठी येईल अशी अपेक्षा होती. मात्र धोनीऐवजी चक्क रविचंद्रन अश्वीन फलंदाजीसाठी आला. अश्वीन आणि जडेजाच्या जोडीनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते फारसं जमलं नाही. 16 व्या ओव्हरला धोनी फलंदाजीला येईपर्यंत चेन्नईची टीम अशा परिस्थितीत होती की त्यांना सामना जिंकता येणार नाही. धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावत 16 बॉलमध्ये नाबाद 30 धावा केल्या. मात्र त्याचा संघाला फारसा फायदा झाला नाही.

धोनीवर सडकून टीका

धोनीने नवव्या क्रमांकावर फलंदाजी येत सर्वांनाच गोंधळात टाकलं. अनेकांनी या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली. जवळपास 100 धावांच्या आसपास धावांची गरज असताना धोनी तळाशी फलंदाजीला येतो आणि 10 धावांची गरज असताना तो अगदी जडेजाच्याही आधी फलंदाजीसाठी येतो असं म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  जिंकताना धोनी वर फलंदाजीला येतो गरज असताना 9 व्या क्रमांकावर, असा खोचक टोला अनेकांनी लगावला आहे.

197 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 100 धावा हव्या असताना धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यात नेमका काय अर्थ आहे? चेन्नईच्या या धोरणामधूनच त्यांनी सामना संपवण्याआधीच हार मानलेली असं दिसून येतं, अशी टीका अमित कुमार नावाच्या चाहत्याने केली आहे. आपल्या पोस्टमध्ये पुढे त्याने, "काही षटकार आणि जाहिरातबाजीसाठी धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला? चाहत्यांसाठी काही षटकांर लगावल्याने अंतिम निकालात काही फरक पडणार नाही. धोनीचा स्वत:वरील विश्वास उडला आहे का? हे त्याला विचारण्याची गरज आहे. आज त्याला वर फलंदाजीला येता आलं असतं," असंही म्हटलं आहे. 

हर्षा भोगलेंनीही धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. 

अन्य एकाने धोनीच्या करिअरमधील हा सर्वात खालचा स्तर असल्याची टीका केली आहे.

197 धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीने आपले पहिले दोन्ही सामने जिंकून पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More