IPL 2025 MI VS CSK : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनची शनिवारी दणक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडले असून रविवारी स्पर्धेत अजून एक महामुकाबला होणार आहे. 23 मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या आयपीएलच्या ग्रेटेस्ट रायव्हलरी संघात सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून आयपीएल 2025 ची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी 23 मार्च रोजी चेन्नईच्या ईडन गार्डनवर सामना खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडेल. आयपीएल 2024 मध्ये लखनऊ विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला हार्दिक पंड्यावर स्लो ओव्हर रेटमुळे बंदीची कारवाई करण्यात आली होती. मात्र तो सामना मुंबईचा आयपीएल 2024 मधील शेवटचा असल्याने ही कारवाई आयपीएल 2025 मध्ये एक्सटेंड करण्यात आली. त्यामुळे तो रविवारी चेन्नई विरुद्ध सामन्यात खेळणार नाही. म्हणून २३ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल. तर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बंगळुरूच्या रिहॅब सेंटरमध्ये असल्याने तो चेन्नई विरुद्ध सामन्यात खेळणार नाही.
हेही वाचा : घटस्फोटानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच पोहोचली इव्हेंटला, चहलबाबत प्रश्न विचारताच 3 शब्दात दिलं उत्तर
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रियान रिलेक्टन हे दोघे सलामी फलंदाजीसाठी उतरू शकतात. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा उतरू शकतो. रॉबिन मिंज आणि नमन धीर हे दोघे मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. तर यावेळी ऑल राउंडर म्हणून अर्जुन तेंडुलकर याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, मुजीब उर रहमान आणि मिचेल सॅंटनर यांना प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
रोहित शर्मा, रयान रिकेलटन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिंज, नमन धीर, अर्जुन तेंदुलकर, मिशेल सॅंटनर, मुजीब उर रहमान, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवोन कॉन्वे, रचिन रविंद्र, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, सॅम करन, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, मथीशा पथिराना