MI VS SRH वानखेडेवर महासंग्राम! हैद्राबादचा सामना करण्यासाठी कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11?

MI VS SRH :  मुंबई इंडियन्सचं त्यांचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर या सीजनचा दुसरा सामना खेळत आहे. संध्याकाळी 7: 30 वाजता सामना सुरु होणार असून 7 वाजता दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस होईल.

पुजा पवार | Updated: Apr 17, 2025, 03:42 PM IST
MI VS SRH वानखेडेवर महासंग्राम! हैद्राबादचा सामना करण्यासाठी कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11?
(Photo Credit : Social Media)

MI VS SRH : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएल 2025 चा (IPL 20255) 33 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians VS Sunrisers Hydrabad) यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी नव्या सीजनमध्ये आतापर्यंत 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. परंतु मुंबई इंडियन्सचा रनरेट हा पॉझिटिव्ह असल्याने ते पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर सनरायजर्स हैदराबादचा संघ नवव्या स्थानी आहे. तेव्हा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी वानखेडेवरील सामना हा निर्णायक ठरणार आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांची प्लेईंग 11 कशी असेल याविषयी जाणून घेउयात. 

हेड टू हेड रेकॉर्ड : 

मुंबई इंडियन्सचं त्यांचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर या सीजनचा दुसरा सामना खेळत आहे. संध्याकाळी 7: 30 वाजता सामना सुरु होणार असून ७ वाजता दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस होईल. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण २३ सामने खेळवण्यात आले असून यातील 13 सामन्यात मुंबईने तर 10 सामन्यात हैदराबादने विजय मिळवलाय. आयपीएल 2024 मध्ये सुद्धा वानखेडेवर मुंबई आणि हैदराबाद संघ आमने सामने आले होते. यात मुंबई इंडिअन्सचा दणदणीत विजय झाला होता. 

हेही वाचा : BCCI ची मोठी कारवाई, गौतम गंभीरच्या मित्राला नोकरीवरून काढलं, टीम इंडियातून बाहेरचा रस्ता

 

रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय : 

मुंबई इंडियन्सचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे. रोहितने आतापर्यंत आक्रमक फलंदाजी केलेली नाही. पाच सामन्यात त्याने आतापर्यंत 56 धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी ही अधिकतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर अवलंबून आहे. तर रोहितचा हा फॉर्म पाहून हैदराबादचा संघ जयदेव उनाडकटला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळू शकते. ईशान किशन हा साह्य हैदराबादकडून खेळत असला तरी यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. तेव्हा मुंबईच्या होम ग्राउंडवर तो कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 : 

मुंबई इंडियन्स : रियान रिक्लेटन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जैक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सैंटनर, जसप्रीत बुमराह, करण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर

सनरायजर्स हैदराबाद : हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, नीतीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पैट कमिंस (कर्णधार), जयदेव उनादकट, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा