IPL 2025 रिंकू सिंगकडून विराट कोहलीचा अपमान?, IPL सोहळ्यातील 'तो' VIDEO व्हायरल

आयपीएल 2025 ला (IPL 2025) सुरुवात झाली असताना उद्घाटन समारंभातील एक व्हिडीओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. यानंतर रिंकू सिंगने (Rinku Singh) विराट कोहलीचा (Virat Kohli) अपमान केल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 23, 2025, 09:05 AM IST
IPL 2025 रिंकू सिंगकडून विराट कोहलीचा अपमान?, IPL सोहळ्यातील 'तो' VIDEO व्हायरल

आयपीएल 2025 ला (IPL 2025) सुरुवात झाली असून, शनिवारी जंगी उद्घाटन सोहळा पार पडला. कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला शाहरुख खान, श्रेया घोषाल, दिशा पटानी अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सर्वांनी आपल्या परफॉर्मन्सने उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवली. मात्र यावेळी शाहरुख खान, रिंकू सिंग आणि विराट कोहली यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. म्युझिकल परफॉर्मन्स झाल्यानंतर शाहरुख खानने रिंकू सिंग आणि विराट कोहली यांना मंचावर बोलावलं होतं.

शाहरुख खानने सुरुवातीला विराट कोहलीला स्टेजवर बोलावलं. यावेळी त्याने प्रेक्षकांना 'कोहली कोहली'च्या घोषणा देण्यास सांगितलं. यानंतर त्याने रिंकू सिंगला स्टेजवर बोलावलं. रिंकूने स्टेजवर गेल्यानंतर शाहरुख खानशी हस्तांदोलन केलं. यानंतर तो विराट कोहलीच्या बाजूने चालत गेला. पण त्याने विराट कोहलीशी हस्तांदोलन केलं नाही. याउलट विराट कोहली त्याच्याकडे पाहत होता. 

रिंकू सिंग नेहमीच विराट कोहली आपला आदर्श असून, त्याच्याबद्दल मनात फार आदर असल्याचं सांगतो. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी रिंकू सिंगने विराट कोहलीचा अनादर केल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 

शाहरुख खानने उद्घाटन सोहळ्यात हृदयस्पर्शी आणि उत्साही भाषण केलं. आयपीएलची 18 वर्षं साजरी करताना त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. तसंच मंचावर विराट कोहली आणि रिंकू सिंग यांच्यासोबत डान्स केला. 

आरबीकडून कोलकाताचा 7 विकेट्सनी पराभव

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सनी पराभव केला. विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात 30 चेंडूत अर्धशतक ठोकलं. बंगळुरुने 16.2 ओव्हरमध्ये 177 धावा करत सामना जिंकला. विराट कोहली 36 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. 

रजत पाटीदारने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेने 31 चेंडूत 56 धावा करत कोलकाताला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. पण इतर फलंदाज त्याचा फायदा घेण्यात अपयशी ठरले. कोलकाताने बंगळुरुसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं.