IPL 2025 Revised Schedule: भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा 17 मेपासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर केलं यात उर्वरित 17 सामने कुठे आणि कधी होणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. 6 ठिकाणी 17 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट असून ते दोन रविवारी खेळवले जातील.
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सला 14 लीग स्टेज सामने खेळायचे होते. त्यापैकी मुंबई इंडियन्सचे 12 लीग स्टेज सामने खेळण्यात आले असून आता केवळ 2 सामने शिल्लक आहेत. आयपीएल 2025 च्या जुन्या वेळेपत्रकानुसार मुंबईचा संघ 11 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळणार होता. तर शेवटचा लीग सामना वानखेडे स्टेडियमवर 15 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार होता, मात्र आता आयपीएल स्थिगित केल्यावर नवीन वेळापत्रक समोर आलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स बुधवार 21 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना खेळेल. तर सोमवार 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात जयपूरच्या स्टेडियमवर सामना होईल.
क्वालिफायर 1 – 29 मे
एलिमिनेटर – 30 मे
क्वालिफायर 2 – 1 जून
अंतिम सामना – 3 जून
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.