IPL 2025 Virat Kohli Viral Video: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकात्यामागील ईडन गार्डन्सच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बंगळुरुचा संघ काही दिवसांपासून कोलकात्यामध्ये तळ ठोकून आहे. दोन्ही संघ मैदानात कसून सराव करत आहे. याच सरावादरम्यानचा एक रंजक व्हिडीओ समोर आला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सराव करताना पाहण्यासाठीही मोठी गर्दी होताना दिसत आहे. अशाच गर्दीतील एक चिमुकला विराटची स्वाक्षरी म्हणजेच ऑटोग्राफ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मुलाबरोबर व्हिडीओत जे काही घडलं ते सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यामुळेच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला आरसीबीचा संघ सरावाला जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. बाहेर पडताना दाराजवळच गर्दीत एक चिमुकला हातात विराटचा फोटो आणि मार्कर घेऊन उभा असतो. विराट जवळून जातो तेव्हा सुरक्षेसाठी लावलेली दोरी न ओलांडता हा चिमुकला विराटकडे ऑटोग्राफ मागतो. पण विराट त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि पुढे निघून जातो. त्यानंतर हा चिमुकला आरसीबीच्या संघाचा पाठलाग करत मैदानात प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहोचतो.
मैदानात पोहचल्यानंतर स्टॅण्डमधून विराटला सराव करताना पाहतानाही हा छोटा मुलगा मैदानाजवळ लावलेल्या जाळ्यांवर चढून, 'विराट भैय्या... विराट भैय्या...' अशा हाका मारुन विराटचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र इथेही तो अपयशी ठरतो.
नक्की पाहा हे फोटो >> IPL 2025: पंतच्या एका मॅचचं मानधन = 'या' कर्णधाराचा सिझनचा पगार; पाहा कोणत्या कॅप्टनला किती सॅलरी?
त्यानंतर आरसीबीचा संघ मैदानातून बाहेर पडतानाही ता चिमुकला गर्दीमध्ये त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या खांद्यावर बसून हातात विराटचा फोटो आणि मार्कर घेऊन ऑटोग्राफसाठी आवाज देताना दिसतो. मात्र विराट गर्दीमधून पुढे निघून जातो आणि बसमध्ये दरवाजाजवळच्या पहिल्या सीटवर बसतो. मात्र यावेळी विराटचं लक्ष बसच्या दाराजवळ गर्दीत असलेल्या चिमुकल्याकडे जातो. तो एका सहकाऱ्याच्या मदतीने चिमुकल्याकडील स्वत:चा फोटो आणि मार्कर मागवून घेतो. हा सहकारी बस बाहेर येऊन विराटचा फोटो घेतो आणि बसमध्ये जातो. बसमध्ये बसलेला विराट त्याच्या फोटोवर चिमुकल्याला ऑटोग्राफ देतो. त्यानंतर हा फोटो पुन्हा गर्दीतील अनेक हात लागत चिमुकल्यापर्यंत पोहोचतो.
विराटच्या ऑटोग्राफसहीतचा हा फोटो हातात पडल्यानंतर चिमुकल्याचा आनंद पाहण्यासारखा असतो. दरम्यान विराटही बसमध्ये थम्ब अप दाखवून या चाहत्याच्या जिद्दीचं कौतुक करताना आणि त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
Virat Kohli reacted and said "Wait" to a little fan among the packed crowd and then asked the security staff to get the poster and gave his autographpic.twitter.com/tYIUHPQaN2
— Fearless(@ViratTheLegend) March 21, 2025
आजच्या सामन्यामध्ये विराटची कामगिरी कशी राहणार याबद्दलची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. विराट हे पर्व रजत पाटीदारच्या कॅप्टनशीपखाली खेळणार आहे. तर कोलकात्याचं नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे.