IPL 2025: '5 वर्षांपासून एकदाही....,' विरेंद्र सेहवागने CSK आणि धोनीमधील खरा दोष दाखवून दिला, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

IPL 2025: महेंद्रसिग धोनीने (Mahendra Singh Dhoni) राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामन्यात 11 चेंडूत 16 धावा केल्या. पण तरीही चेन्नई संघ जिंकू शकला नाही.   

शिवराज यादव | Updated: Mar 31, 2025, 06:19 PM IST
IPL 2025: '5 वर्षांपासून एकदाही....,' विरेंद्र सेहवागने CSK आणि धोनीमधील खरा दोष दाखवून दिला, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्ज संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सविरोधातील सामन्यात अंतिम ओव्हरमध्ये चेन्नईला 20 धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा मैदानात होते. धोनीने यावेळी मोटा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सीमेवर झेलबाद झाला. त्याने 11 चेंडूत 16 धावा केल्या. रवींद्र जडेजाही फार चांगली कामगिरी करु शकला नाही आणि चेन्नईचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. चेन्नईसमोर 183 धावांचं आव्हान होतं. चेन्नईचा फार मोठ्या फरकाने पराभव झाला नसला तरी चेन्नई संघ गेल्या पाच वर्षात 180 पेक्षा जास्त धावांचं आव्हान पूर्ण करु शकलेलं नाही. 

Add Zee News as a Preferred Source

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू, प्रशिक्षक म्हणून काम केलेला माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दावा केला आहे की, असं फार कमी वेळा घडतं जेव्हा संघ शेवटी प्रत्येक ओव्हरला 20 धावा करू शकला. जरी धोनी आयपीएलमध्ये असे करणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक असला तरी अलीकडच्या काळात असं घडलेलं नाही.

"दोन ओव्हरमध्ये 40 धावा करणं हे फार आव्हानात्मक आहे. मधल्या फळीत कितीही मोठा खेळाडू असला तरी हे फार कठीण काम आहे. तुम्ही एखाद्या किंवा दुसऱ्या क्षणी जिंकू शकता. एकदा धोनीने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर 24, 25 धावा केल्या होत्या. एकदा त्याने इरफान पठाणच्या गोलंदाजीवर 19 ते 20 धावा केल्या होत्या," असं वीरेंद्र सेहवागने Cricbuzz शी बोलताना सांगितलं. 

वीरेंद्र सेहवागने चेन्नई संघ आव्हान पूर्ण करताना किती संघर्ष करतं याची आकडेवारीच मांडली आहे. "तुम्हाला जास्तीत जास्त एक किंवा दोन सामने आठवतील. कोणताही आताचा सामना तुम्हाला आठवत नाही. पाच वर्षांपासून चेन्नई संघ 180 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्यास असमर्थ ठरला आहे," अशी आकडेवारी विरेंद्र सेहवागने सांगितली. 

17 व्या षटकाच्या सुरुवातीलाच धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्याची विकेट गमावली. जडेजासोबत असताना, धोनीने महेश थीकशनाला आव्हान दिलं. त्याला स्थिरावण्यासाठी अनेक चेंडू खेळावे लागले. नंतर त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला पण सुपरकिंग्जला आवश्यक धावगतीशी जुळवून घेता आले नाही.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More