IPL 2026 Auction LIVE Streaming : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग असून याचा 19 वा सीजन पुढील वर्षी पार पडणार आहे. IPL 2026 साठी मिनी ऑक्शन मंगळवार 16 डिसेंबरला पार पडणार आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग असणार असून यातील 77 जागांसाठी ऑक्शन होणार आहे. यात फ्रेंचायझींकडे खेळाडूंना विकत घेण्यासाठी 237.55 कोटी रुपये आहेत. यंदाचं मिनी ऑक्शन हे अबुदाबीमध्ये होणार आहे.
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरन ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र ऑक्शनमध्ये यापूर्वी देखील पाहिलंय की काहीही होऊ शकतं. वेंकटेश अय्यर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रवी बिष्णोई हे देखील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असू शकतात. संघांकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसे असल्याने, अनकॅप्ड आणि प्रतिभावान खेळाडूंनाही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येईल.
हेही वाचा : 'आपण सगळे मुंबईत आहोत...', वानखेडेवर झालं मेस्सीचं जोरदार स्वागत, सचिन तेंडुलकरनेही मराठीतून मानले आभार
IPL 2026 साठी मिनी ऑक्शन मंगळवार 16 डिसेंबरला पार पडणार आहे. दुपारी 2:30 वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ऑक्शन सुरु होईल. यंदा ऑक्शनमध्ये 350 खेळाडूंना सिलेक्ट करण्यात आले आहे. यापैकी कोणत्या 77 खेळाडूंना फ्रेंचायझी आपल्या संघात घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मंगळवार 16 डिसेंबर रोजी होणारं आयपीएल ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर मोबाईल यूजर्सना जिओस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर सामना पाहता येईल.
IPL 2026 मिनी ऑक्शन कधी होणार आहे?
IPL 2026 साठी मिनी ऑक्शन मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
ऑक्शन किती वाजता सुरू होईल?
IPL 2026 मिनी ऑक्शन दुपारी 2:30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होईल.
ऑक्शनमध्ये एकूण किती खेळाडू असतील?
IPL 2026 मिनी ऑक्शनसाठी 350 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.