Message to BCCI over Vaibhav Sooryanvanshi: आयपीएल 2026 मध्ये मंगळवारी मुंबई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. पाऊस पडल्यामुळे फक्त 11 ओव्हर्सचा सामना खेळवण्यात आला. राजस्थानने प्रथम फलंदाजी केली असता वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैसवालने स्फोटक खेळी केली. 15 वर्षीय वैभवने केलेल्या खेळीमुळे भारताचा दिग्गज खेळाडू इरफान पठाणने त्याला तात्काळ भारतीय संघात स्थान देण्याचा आग्रह केला आहे. बीसीसीआयने आता प्रतिक्षा थांबवावी आणि वैभव सूर्यवंशीला भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावं असं त्याने म्हटलं आहे.
वैभव सूर्यवंशीने फक्त 14 चेंडूत 39 धावा ठोकल्या. त्याने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकल्याने क्रिकेटचाहते आणि तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. इरफान पठाणने हा तरुण खेळाडू नैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे. तसंच वैभव सूर्यवंशी क्रिकेटमध्ये जशी कामगिरी करत आहे, तशी आपण याआधी कधीच पाहिलेली नाही असं त्याने म्हटलं आहे.
"वैभव सूर्यवंशी हा नैसर्गिक खेळाडू आहे. तो वयाच्या 15 व्या वर्षी क्रिकेटमध्ये जी कामगिरी करत आहे, ती मी याआधी कधीच पाहिलेलं नाही," असं इरफान पठाणने युटयूबवर सांगितलं. पठाणने पुढे म्हटलं की, हा तरुण खेळाडू विशेषतः याच क्षणाची वाट पाहत होता असं वाटत होते.
"हा 15 वर्षांचा अद्भूत खेळाडू म्हणाला होती, मी जसप्रीत बुमराहची वाट पाहत आहे. गेल्या वर्षी मी त्याच्या गोलंदाजीवर बाद झालो होतो. या वर्षी मी येऊन त्याच्याविरोधात मोठे शॉट खेळणार आहे. आणि त्याने बुमराहला पहिल्याच चेंडूवर शॉट मारला," असं इरफान म्हणाला.
भारताचा हा माजी खेळाडू सूर्यवंशी ज्याप्रकारे परिस्थितीला सामोरा जात आहे ते पाहून प्रभावित झाला आहे. त्याच्या खेळीमुळे बुमराहला आपल्याच योजनांवर शंका आली असावी असं त्याने म्हटलं. त्याने सांगितलं की, "ज्या प्रकारे बुमराहकडे कोणतीही स्पष्ट योजना नव्हती, ज्या प्रकारे तो धीम्या गोलंदाजीकडे वळला, ते पाहता वैभव सूर्यवंशीने त्यालाही विचार करण्यास भाग पाडले. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये भारताला बुमराहसारखा गोलंदाज सापडला नाही. तो सर्वकालीन महान गोलंदाज आहे. आणि ही कामगिरी त्याच्याविरोधात साधली आहे".
आता निवडकर्त्यांनी जास्त वेळ वाट न पाहता 15 वर्षीय खेळाडूला लवकरात लवकर संघात सामील करुन घ्यावं असं मतही त्याने व्यक्त केलं आहे. "या मुलाला जास्त वेळ वाट पाहायला लावू नका. त्याला भारतीय संघात घ्या. विचार करा हा मुलगा 20 वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खेळणार आहे. गोलंदाजांसाठी हे फार भीतीदायक आहे," असं तो म्हणाला.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.