Raghu Sharma Celebration Video: सामन्यामधील 13 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरच या नवख्या खेळाडूला आयपीएलमधील पहिली विकेट मिळाल्यानंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढून दाखवली

Raghu Sharma Celebration Video: वानखेडेच्या मैदानावर सोमवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघामधील सामन्यात मुंबईने 200 हून अधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग करत विजय मिळवला. मुंबईच्या या विजयामध्ये फलंदाजांनी मोठं योगदान दिलं असलं तरी या सामन्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करणारा फिरकीपटू रघू शर्माने! रघू पहिल्यांदाच आयपीएलचा सामना खेळला आणि पहिल्याच सामन्यात त्याने पहिली विकेट घेतल्यानंतर अनोखे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
लखनऊच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना डावाला आक्रमक सुरुवात केली. मिचेल मार्श आणि निकोलस पुरनने तुफान फटकेबाजी केल्याने आता लखनऊचा संघ 250 वगैरे धावा करतो काय असं वाटू लागलं. मात्र पहिल्या डावाच्या उत्तरार्धात मुंबईच्या गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं. पहिल्यांदाच आयपीएलचा सामना खेळणाऱ्या रघू शर्मानेही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजी करताना चार ओव्हरमध्ये 36 धावा देत एक विकेट घेतली. सामन्यातील 3 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चेंडू खेळून काढण्याच्या नादात अक्षत सुर्यवंशीने रघुकडेच बॉल टोलवला आणि तो कॉट अॅण्ड बोल्ड झाला.
रघुने अक्षतला बाद केल्यानंतर आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढून मुंबई इंडियन्सच्या डगआऊटच्या दिशेनं दाखवली. रघू नेमकं काय दाखवतोय आणि त्या चिठ्ठीवर काय लिहिलं आहे हे पाहण्यासाठी कर्णधार सुर्यकुमार यादवही ही चिठ्ठी अगदी वाकून वाकून पाहत होता. या चिठ्ठीमधील मजकूर काय होता ते काही वेळाने स्पष्ट झालं. रघुने या चिठ्ठीमध्ये, "गुरुदेवांच्या कृपेने, अत्यंत वेदनादायी अशी १५ वर्षे आज संपुष्टात आली. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे (निळा आणि सोनेरी) आभार. मी सदैव ऋणी राहीन. जय श्री राम," असा मजकूर लिहिला होता. त्याने या चिठ्ठीमधून त्याला खेळण्याची संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या संघाचे आभार मानले.
1) हाच तो व्हिडीओ...
#RaghuSharma makes a statement with that wicket
— Star Sports (@StarSportsIndia) May 4, 2026
Years of hard work and belief are finally paying off. #TATAIPL Revenge Week 2026 #MIvLSG | LIVE NOW https://t.co/hc4PVkY1Pc pic.twitter.com/QFbQB1OeRg
2) सूर्या चिठ्ठी वाचताना
Raghu Sharma ki parchi… script already likhi hui thi #MIvsLSG #IPL #IPL2026 #CricketMemes #Parchi #MumbaiIndians #MIvsLSG pic.twitter.com/JFe1DQESgv
— Hariom Hudda (@Hariomhudda8949) May 4, 2026
3) चिठ्ठीतला मजकूर
This is what was written on Raghu Sharma's paper:
— (@LoyalSachinFan) May 4, 2026
"A very painful 15 years by divine mercy of gurudeva ended today. Thanks Mumbai Indians (Blue and Gold) for giving me this opportunity. Ever grateful. Jai Shri Ram". pic.twitter.com/SjP4ippvxP
मिचेल मार्श, निकोलस पुरन, अॅडन मारकरम आणि हिंमत सिंह यांनी केलेल्या उत्तम फटकेबाजीमुळे लखनऊच्या संघाने 20 ओव्हरमध्ये पाच बाद 228 धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकडून रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या दोघांनी उत्तम सुरुवात करुन दिली. 10 ओव्हरमध्येच मुंबईची धावसंख्या 143 वर असताना रायनच्या रुपात पहिली विकेट पडली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मुंबईने हा सामना 6 विकेट आणि 8 बॉल राखून जिंकला.