मुंबई इंडियन्स सोडणार अर्जुन तेंडुलकरची साथ! IPL 2026 ऑक्शनपूर्वी 'या' संघात ट्रेड होणार

IPl 2026 : मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय. दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला ट्रेड केलं जाऊ शकतं.   

पूजा पवार | Updated: Nov 12, 2025, 08:47 PM IST
मुंबई इंडियन्स सोडणार अर्जुन तेंडुलकरची साथ! IPL 2026 ऑक्शनपूर्वी 'या' संघात ट्रेड होणार
(Photo Credit : Social Media)

IPL 2026 : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या 19 व्या सीजनबाबत फॅन्समध्ये मोठी उत्सुकतता आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आयपीएल 2026 साठी मिनी ऑक्शन होण्याची शक्यता आहे. असं असतानाच आता मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबई इंडियन्स ही आयपीएल 2026 ऑक्शनपूर्वी अर्जुन तेंडुलकरची साथ सोडण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोणत्या खेळाडूसोबत होणार ट्रेड? 

अर्जुन तेंडुलकर हा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा धाकटा मुलगा आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने बेस प्राईजवर अर्जुन तेंडुलकरची निवड केली होती. मात्र गेल्या सीजनमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. क्रिकेबजच्या एका रिपोर्टनुसार अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स ट्रेड करण्याची शक्यता आहे. अर्जुन आणि शार्दूल ठाकूरबाबत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्समध्ये बातचीत सुरु आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की दोघांची अदलाबदल होऊ शकते, दरम्यान हा पूर्णपणे कॅश ट्रान्सफर होऊ शकतो.

आयपीएलच्या ट्रेड नियमानुसार बीसीसीआयच कोणत्याही ट्रांसफरची अधिकृत घोषणा करू शकते. त्यामुळे कदाचित सध्या यावर फ्रेंचायझीला काहीही बोलायचं नाहीये. मुंबई क्रिकेट जवळच्या एका सूत्राने क्रिकबझला पुष्टी दिली की दोघांमध्ये ट्रेड होण्याची शक्यता आहे आणि काही दिवसांतच याची घोषणा केली जाऊ शकते.

शार्दूलला घेणार मुंबई इंडियन्स?

शार्दुल ठाकूर हा मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सने त्यांना 2 कोटी रुपयांना रिप्लेसमेंट म्हणून आपल्या संघात सामील केले. शार्दूलने मागच्या सीजनमध्ये 10 सामने खेळले ज्यात त्याने 13 विकेट घेतले. मात्र फलंदाजीत तो चांगली कामगिरी करू शकला नाही. 

अर्जुन तेंडुलकरला मागच्या सीजनमध्ये मुंबईकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2023 मध्ये अर्जुन तेंडुलकरचं मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण झालं. त्याने 2023 मध्ये 4 सामने खेळले यात 3 विकेट घेतले. 2024 मध्ये त्याने फक्त 1 सामना खेळला पण त्याला यात एकही विकेट घेता आली नाही.  

FAQ : 

अर्जुन तेंडुलकरला कोणत्या खेळाडूसोबत ट्रेड केले जाऊ शकते?
अर्जुन तेंडुलकरला शार्दूल ठाकूरसोबत ट्रेड केले जाऊ शकते.

अर्जुन तेंडुलकरचे प्रदर्शन कसे आहे?
अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून 5 मैच खेळले आहेत आणि 3 विकेट घेतले आहेत.

अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून किती मैच खेळले आहेत?
अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून 5 मैच खेळले आहेत.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More