IPL 2026 Ravindra Jadeja Goes To Rajasthan Royals At A Reduced Fee: आईपीएल 2026 च्या सुरुवात होण्यास अजून बराच काळ बाकी असला तरी क्रिकेट विश्वात सध्या एक मोठी ट्रेड डील जबरदस्त चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन नावाजलेल्या फ्रँचायझींमध्ये रवींद्र जडेजा, सॅम करन आणि संजू सॅमसन यांच्या भविष्यावरून गंभीर मंथन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही टीम्समधील या गुप्त चर्चेमुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संवाद सकारात्मक दिशेने सुरू असून सर्व काही नियोजनाप्रमाणे पार पडले, तर येत्या हंगामात मोठे चेहरे नवीन रंगात दिसू शकतात. अशा स्थितीत अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि इंग्लिश स्टार सॅम करन राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदान गाजवताना दिसतील. दुसरीकडे, गेल्या चार वर्षांपासून राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसू शकतो.
या संभाव्य डीलमुळे दोन्ही टीम्सच्या बॅलन्समध्ये मोठे बदल होणार आहेत. जडेजा आणि करनसारखे दमदार ऑलराउंडर्स जर राजस्थानकडे गेले तर त्यांची खेळण्याची शैली अधिक प्रभावी होऊ शकते, तर संजू सॅमसनच्या आगमनाने सीएसकेला एक स्थिर, अनुभवी आणि फॉर्ममध्ये असलेला टॉप-ऑर्डर बॅटर मिळेल.
IPL 2026 च्या सीझनपूर्वी रिटेन्शन डेडलाईन संपण्याच्या काही तास आधीच ट्रेड मार्केटमध्ये मोठी हालचाल झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ‘पिलर’ मानला जाणारा रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सकडे गेला असून त्यांची फी 18 कोटीवरून थेट 14 कोटींवर आणण्यात आली आहे. दुसरीकडे, मागील चार हंगामांपासून राजस्थानचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन आता CSK ची पिवळी जर्सी घालून मैदानात दिसणार आहे.
जडेजाने CSK साठी तब्बल 12 हंगाम खेळले होते. IPL मध्ये 250हून अधिक सामने खेळलेल्या अनुभवी अॉलराउंडरची फी ट्रेड करारानुसार 18 कोटींवरून कमी करून 14 कोटी करण्यात आली आहे. त्यामुळे जडेजाची राजस्थानकडे ‘रिटर्न एंट्री’ होत आहे.
RR चा चेहरा बनलेला आणि सातत्याने टीमला मजबूत नेतृत्व दिलेला संजू सॅमसन आता चेन्नईसाठी मैदानात उतरणार आहे. त्यांची विद्यमान फी 18 कोटीच राहणार आहे. IPL डेब्यू (2013) पासून सॅमसनने 177 सामने खेळले असून ही त्यांची तिसरी फ्रँचायझी ठरणार आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More
LIVE|
THA
36/7(10 ov)
|
VS |
MAS
|
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.