बलात्काराचे आरोप असणाऱ्या सह 'या' 5 खेळाडूंना RCB देणार नारळ, IPL 2026 पूर्वी होणार मोठे बदल!

IPL 2026 :  IPL 2026 ची तयारी सुरु झालेली आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा या RCB च्या रिटेन्शन आणि रिलीज लिस्टवर आहेत. बीसीसीआयने 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व संघांना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितलीये. 

पूजा पवार | Updated: Nov 12, 2025, 09:10 PM IST
बलात्काराचे आरोप असणाऱ्या सह 'या' 5 खेळाडूंना RCB देणार नारळ, IPL 2026 पूर्वी होणार मोठे बदल!
(Photo Credit : Social Media)

IPL 2026 : आयपीएल 2026 बाबत फॅन्समध्ये आता मोठी उत्सुकतता आहे. मागच्यावर्षी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करून विजेतेपद पटकावले. आता IPL 2026 ची तयारी सुरु झालेली आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा या RCB च्या रिटेन्शन आणि रिलीज लिस्टवर आहेत. बीसीसीआयने 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व संघांना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितलीये. 

Add Zee News as a Preferred Source

मागच्या वर्षी आयपीएलचं चॅम्पिअनपद पटकावलेली आरसीबी पुढील सीजनमध्ये संघात फार बदल करण्याची शक्यता नाहीये. कारण संघ सध्या मजबूत आहे. मात्र तरीही काही खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे आणि त्यांच्या भारी किंमतीमुळे, आरसीबीचा संघ त्यांना नारळ देऊ शकतो. 

लियाम लिविंगस्टोनला करणार रिलीज?

इंग्लंडचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोन याचं नाव आरसीबीच्या रिलीज लिस्टमध्ये असू शकतं. RCB ने त्यांना 8.75 कोटींना खरेदी केलं होतं. परंतु आयपीएल 2025 मध्ये त्याने फक्त 112 धावाच केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 16 पेक्षा कमी होती. आरसीबीकडे टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथेल आणि कृणाल पंड्यासारखे फॉर्ममध्ये असलेले मिडल ऑर्डरमधील पर्याय आहेत, त्यामुळे लिव्हिंगस्टोनला त्याच्या महागड्या किंमतीमुळे रिलीज केलं जाऊ शकतं. 

बलात्काराचे आरोप असणाऱ्या यशला बाहेरचा रस्ता?

आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचं गोलंदाजीचं युनिट खूप संतुलित राहीलं. जॉश हेजलवुड आणि भुवनेश्वर कुमार यांनी मिळून 39 विकेट घेतल्या. त्यामुळे त्यांचं संघात राहणं नक्की आहे. तर भारतीय पेसर्स यश दयाल आणि रसिख सलाम दारला आरसीबी बाहेरचा रस्ता दाखवू शकते. हंगामातील शेवटच्या सामन्यांमध्ये यश दयालची कामगिरी खास नव्हती. तसेच दोन तरुणींनी त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले होते. सध्या ही प्रकरण न्यायालयात आहेत. जर आरसीबीने लिविंगस्टोन, यश दयाल आणि रसिख सलाम या तिघांना रिलीज केलं तर त्यांच्याकडे जवळपास 19.75 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहील. या बजेटमुळे त्यांना आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

RCB ची संभाव्य रिटेंशन लिस्ट : 

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, मयंक अग्रवाल, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, क्रुणाल पांड्या, जॉश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एंगिडी, नुवान तुषारा, सुयश शर्मा, स्वस्तिक चिकार, स्वप्निल सिंह, मनोज बंधाजे.

RCB ची संभाव्य रिलीज खेळाडूंची लिस्ट : 

लियाम लिविंगस्टोन, यश दयाल, रसिख सलाम दार, मोहित राठी, अभिनंदन सिंह. 

FAQ : 

आरसीबी कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकते?
आरसीबी लियाम लिविंगस्टोन, यश दयाल आणि रसिख सलाम दार या खेळाडूंना रिलीज करू शकते.

आरसीबीच्या रिटेंशन लिस्टमध्ये कोणते खेळाडू असू शकतात?
आरसीबीच्या रिटेंशन लिस्टमध्ये रजत पाटीदार, विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, मयंक अग्रवाल, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, क्रुणाल पांड्या, जॉश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एंगिडी, नुवान तुषारा, सुयश शर्मा, स्वस्तिक चिकार, स्वप्निल सिंह, मनोज बंधाजे असू शकतात.

आरसीबीच्या रिलीज लिस्टमध्ये किती खेळाडू असू शकतात?
आरसीबीच्या रिलीज लिस्टमध्ये 5 खेळाडू असू शकतात.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More