कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठी कोलकात्यामध्ये लिलाव पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन शेमरन हेटमायरला ७.७५ कोटी रुपये मिळाले. दिल्लीच्या टीमने हेटमायरला विकत घेतलं. यंदाच्या मोसमात हेटमायरची बेस प्राईज ५० लाख रुपये होती. म्हणजेच हेटमायरला त्याच्या बेस प्राईजपेक्षा १५.५० पट पैसे जास्त मिळाले. करोडपती झाल्यानंतर शिमरन हेटमायरने जोरदार सेलिब्रेशन केलं. हॉटेलच्या रुमवरच हेटमायरने भन्नाट डान्स केला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेमरन हेटमायर हा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये हेटमायरने शतकी खेळी केली. हेटमायरच्या या शतकामुळे भारताला पराभवाचा धक्का लागला. दुसऱ्या वनडेमध्ये मात्र हेटमायरला मोठी खेळी करता आली नाही. आयपीएलच्या मागच्या मोसमात हेटमायर बंगळुरुकडून खेळला होता. पण मागच्या मोसमात यशस्वी कामगिरी करता न आल्यामुळे बंगळुरुने हेटमायरला सोडून दिलं. मागच्या मोसमात हेटमायरला बंगळुरुने ४.२० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 


आयपीएलचा लिलाव : हे खेळाडू झाले मालामाल