IPL 2026 Auction : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग असून याचा 19 वा सीजन पुढील वर्षी पार पडणार आहे. IPL 2026 साठी मिनी ऑक्शन मंगळवार 16 डिसेंबरला पार पडणार आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग असणार असून यातील 77 जागांसाठी ऑक्शन होणार आहे. यात फ्रेंचायझींकडे खेळाडूंना विकत घेण्यासाठी 237.55 कोटी रुपये आहेत. यंदाचं मिनी ऑक्शन हे अबुदाबीमध्ये होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाकडे ऑक्शनमध्ये खर्च करण्यासाठी 43.40 कोटी रुपये आहेत. तेव्हा रिपोर्ट्सनुसार सीएसके ऑक्शनमध्ये खालील 5 स्टार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोर लावू शकते.
चेन्नई सुपरकिंग्सचा मागील सीजन हा अत्यंत निराशाजनक ठरला. आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये सीएसके शेवटच्या स्थानावर राहिली. त्यानंतर ऑक्शनपूर्वी सीएसकेने रवींद्र जडेजा, मथीशा पाथिराणा, सॅम करन, डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र सारख्या वरिष्ठ खेळाडूंना रिलीज केले. चेन्नई सुपरकिंग्सला आता येत्या काळासाठी पुनर्बांधणी करायची आहे. त्यामुळे ऑक्शनमध्ये ते काही स्टार खेळाडूंना संधी देऊ शकतात.
रीस टॉपली : सीएसकेने श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पाथिराणाला रिलीज केले. तेव्हा त्याची जागा घेण्यासाठी सीएसके रीस टॉपली, जेराल्ड कोएत्झी यांना लक्ष करू शकतो. तसेच तज्ञ डेथ-ओव्हर गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करून बाय-बॅक करण्याचा प्रयत्न देखील सीएसके करू शकते.
व्यंकटेश अय्यर : सीएसकेने संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोघांना ट्रेड केलं. जडेजाची पोकळी भरून काढण्यासाठी, चेन्नई सुपर किंग्ज व्यंकटेश अय्यर किंवा मोहित शर्मा सारख्या भारतीय अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकू शकते.
लियाम लिव्हिंगस्टोन : मधल्या फळीतील धमाकेदार फलंदाज आणि गोलंदाज तसेच उत्कृष्ट फिनिशर म्हणून इंग्लंडचा क्रिकेटर लियाम लिव्हिंगस्टोनला घेण्यासाठी चेन्नईचा संघ बोली लावू शकतो.
रवी बिश्नोई : एलएसजीने रिलीज केलेला लेग-स्पिनर रवी बिश्नोई याला घेण्यासाठी चेन्नईचा संघ बोली लावू शकतो.
डेव्हिड मिलर : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेव्हिड मिलर हा एक उत्तम सामना जिंकणारा खेळाडू आहे. सीएसकेच्या खालच्या फळीला बळकटी देण्यासाठी तो प्राधान्य देऊ शकतो.
IPL 2026 साठी मिनी ऑक्शन मंगळवार 16 डिसेंबरला पार पडणार आहे. दुपारी 2:30 वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ऑक्शन सुरु होईल. यंदा ऑक्शनमध्ये 350 खेळाडूंना सिलेक्ट करण्यात आले आहे. यापैकी कोणत्या 77 खेळाडूंना फ्रेंचायझी आपल्या संघात घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मंगळवार 16 डिसेंबर रोजी होणारं आयपीएल ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर मोबाईल यूजर्सना जिओस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर सामना पाहता येईल.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.