IPL ला 16400000000 कोटींचं नुकसान, BCCI च्या तिजोरीला मोठा फटका, नेमकं कारण काय?

IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असून यामुळे बीसीसीआयला दरवर्षी कोट्यवधींचा फायदा होतो. मात्र यावेळी त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

पूजा पवार | Updated: Oct 16, 2025, 04:34 PM IST
IPL ला 16400000000 कोटींचं नुकसान, BCCI च्या तिजोरीला मोठा फटका, नेमकं कारण काय?
(Photo Credit : Social Media)

IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठी आणि महागडी क्रिकेट लीग असून याच्याच यशामुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत बोर्डपैकी एक बनलं. भारतात निवडणुका असोत किंवा कोरोना महामारी आयपीएलचं स्थान बदललं मात्र 2008 पासून दरवर्षी आयपीएलचं आयोजन केलं गेलं. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा यशाची नवी शिखर गाठते. मात्र काही दिवसांपूर्वीच एक रिपोर्ट समोर आला असून यानुसार आता आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्युला मोठा फटका बसला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एका रिपोर्टनुसार इंडियन प्रीमियर लीगच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कमतरता आली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत आयपीएलची  ब्रँड व्हॅल्यू 8 टक्क्यांनी कमी झालीये. मागच्यावर्षी  इंडियन प्रीमियर लीगच्या ब्रँड व्हॅल्यू 82,700 कोटी होती. मात्र आता ती घटून 76,100 कोटी झालीये. आयपीएलला झालेल्या कोट्यवधीच्या नुकसानचं कारण ब्राडकास्टिंग एरियामध्ये झालेले विलीनीकरण आणि रियम गेमिंगवर आलेले प्रतिबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. वार्षिक मूल्यांकन जारी करणाऱ्या डीडी अँड अ‍ॅडव्हायझरीजचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, या टी20 लीगच्या मूल्यात सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 92,500 कोटी रुपये होती. 

का कमी झाली आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू?

रिपोर्टमध्ये 'बियॉन्ड 22 यार्ड्स' च्या हवाल्याने आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागे दोन प्रमुख कारण सांगण्यात आलेली आहेत. 2024 मध्ये प्रमुख प्रसारण कंपन्या डिझनी स्टार आणि वायकॉम 18 यांचं विलीनीकरण झालं. त्यामुळे मीडिया अधिकार मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धांमध्ये कमतरता आली आहे. तर याच दुसरं कारण हे रियल मनी गेमिंगवर लावण्यात आलेले प्रतिबंध म्हटलं गेलं आहे. कारण आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये अनेक रियल मनी गेमिंग कंपन्यांचा सहभाग होता. 

दोन वर्षात कोट्यवधीचं नुकसान :

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, वरील दिलेल्या दोन प्रमुख कारणांमुळे, त्याच्या परिसंस्थेचे मूल्य अंदाजे 16,400 कोटीने कमी झाले आहे. 2023 मध्ये ते अंदाजे 92,500 कोटी होते आणि आता ते 76,100 कोटी पर्यंत घसरले आहे.

कधी होणार आयपीएल 2026 चं मिनी ऑक्शन?

अनेक क्रिकेट प्रेमी आता आयपीएल 2026 ची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2026 साठी डिसेंबर 2025 मध्ये मिनी ऑक्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या आठवड्यात हे ऑक्शन होण्याची शक्यता असून नोव्हेंबर 15 पर्यंत फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. 

FAQ : 

IPL ची 2025 ची ब्रँड व्हॅल्यू किती आहे?
२०२५ मध्ये IPL ची ब्रँड व्हॅल्यू ₹७६,१०० कोटी आहे. ही मागील वर्षीच्या ₹८२,७०० कोटींपासून ११% ने कमी झाली आहे.

IPL ची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याची प्रमुख कारणे काय?
ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत: एक, ऑनलाइन गेमिंग (रिअल मनी गेमिंग) वर लावलेला बंदोबस्त, ज्यामुळे स्पॉन्सरशिपमध्ये अनेक कंपन्यांचा सहभाग कमी झाला. दुसरे, प्रमुख प्रसारण कंपन्या डिस्ने स्टार आणि वायकॉम १८ चे विलीनीकरण, ज्यामुळे मीडिया हक्कांसाठी स्पर्धा कमी झाली.

IPL 2026 चं मिनी ऑक्शन कधी होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPL 2026 साठी मिनी ऑक्शन डिसेंबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तारीख १३ ते १५ डिसेंबर २०२५ अशी अपेक्षित आहे.

About the Author