IPL Player Accused Of Physically Molest And Assault By Female Cricketer: भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला क्रिकेटरने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूवर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक अत्याचार आणि धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पीडित महिला क्रिकेटरने नोएडा एक्सप्रेस-वे पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली असून, तपास सुरू करण्यात आला आहे.
पीडित महिला क्रिकेटर सध्या नोएडामध्ये राहते. तिने सांगितले की, एका आयपीएल खेळाडूने तिच्याशी मैत्री करून भावनिक नातं निर्माण केलं आणि लग्नाचं आश्वासन दिलं. पण नंतर त्याने तिचा विश्वासघात करून अत्याचार केला. या घटनेनंतर ती थेट लखनऊ पोलीस मुख्यालयात पोहोचली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली. सदर आयपीएल खेळाडू दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. विशेष म्हणजे, त्या खेळाडूने स्वतःच आठ नोव्हेंबर रोजी बाराबंकी कोतवालीत पीडित महिला क्रिकेटरविरोधात धमक्यांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे.
हे ही वाचा: IND vs SA 1st Test: टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार ऑलराउंडर पहिल्या टेस्टमधून बाहेर; कोचकडून मोठी अपडेट
माहितीनुसार, पीडित महिला क्रिकेटर मूळची आंध्र प्रदेशातील आहे, मात्र ती दुसऱ्या राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. ती काही महिन्यांपासून नोएडामधील एका पीजीमध्ये राहते. मे 2025 मध्ये तिचा आणि त्या आयपीएल खेळाडूचा संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला. दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली, आणि नंतर ती जवळीक प्रेमसंबंधात परिवर्तित झाली.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी खेळाडूने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे त्याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर जेव्हा तिने लग्नाविषयी विचारणा केली, तेव्हा तिला मारहाण करून हाकलून लावलं. इतकंच नव्हे तर, त्या वेळी खेळाडूने तिचे काही खाजगी फोटो आणि व्हिडीओ घेतले असल्याचंही समोर आलं आहे.
महिला क्रिकेटरचा आरोप आहे की, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जुलै रोजी एका अन्य महिलेनं स्वतःला त्या खेळाडूची गर्लफ्रेंड सांगत तिला फोन केला आणि जीव मारण्याची धमकी दिली. त्या महिलेनं हेही सांगितलं की, खेळाडूसोबतचे तुझे खाजगी फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर टाकले जातील. या घटनेमुळे पीडिता पूर्णपणे घाबरली आणि मानसिकदृष्ट्या तणावाखाली गेली. यानंतर तिच्याकडे अनेक अनोळखी क्रमांकांवरून फोन आले. या सर्वांमधून तिला सतत धमक्या मिळत राहिल्या. त्यामुळे तिने 13 ऑक्टोबर रोजी एक्सप्रेस-वे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. मात्र, समाधानकारक कारवाई न झाल्याने ती 24 ऑक्टोबर आणि 8 नोव्हेंबर रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात गेली. शेवटी लखनऊ मुख्यालयात पोहोचून तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली.
या प्रकरणावर एसीपी ट्विंकल जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, “महिला क्रिकेटरने दिलेली तक्रार आमच्या संज्ञानात आली आहे. तिच्या आरोपांवर सखोल तपास सुरू आहे. संबंधित खेळाडू आणि अन्य व्यक्तींची चौकशी केली जाईल.”
हे ही वाचा: PAK दौरा सोडणार श्रीलंका संघ? इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटानंतर खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, आरोपी क्रिकेटरने देखील बाराबंकी कोतवालीत महिला क्रिकेटरविरोधात धमक्यांबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, पीडित महिला त्याच्याकडून पैशांची मागणी करत होती आणि धमक्या देत होती, असा आरोप त्याने केला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे.
पीडित महिला क्रिकेटरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली की, “माझ्याशी अन्याय झाला आहे. मी फक्त न्याय मागते आहे. माझा आवाज पोहोचावा आणि माझ्या सारख्या इतर महिलांना न्याय मिळावा.” या प्रकरणाने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवली आहे. आयपीएलसारख्या ग्लॅमरस लीगशी जोडलेलं हे प्रकरण आता कायदेशीर वादात परिवर्तित झालं असून, पोलीस लवकरच सविस्तर अहवाल सादर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.