Vipraj Nigam : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा ऑलराऊंडर क्रिकेटर विप्रज निगम संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मैदानावर जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या या युवा क्रिकेटरला ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांनी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल केली असून त्याला आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमक्या मिळत असल्याचे समोर आले आहे. विप्रज निगम हा मुळतः उत्तर प्रदेशच्या हैदरगढ क्षेत्राचा असून रविवारी विप्रजने कोतवाली पोलीस स्थानकात मिळणाऱ्या धमक्यांबाबत तक्रार दाखल केली. विप्रज निगम (Vipraj Nigam) हा आयपीएल 2025 नंतर चर्चेत आला होता, यावेळी त्यांनी दमदार परफॉर्मन्स केला होता.
विप्रज निगमने एका युवतीवर ब्लॅकमेल आणि बदनामीचा आरोप लावला आहे. विप्रज निगमने पोलिसांना सांगितलं की एक युवती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त हस्तक्षेप करत आहे. युवतीने त्याच्या चुकीच्या मागण्या केल्या, ज्या मान्य न केल्यावर युवतीने त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. क्रिकेटर विप्रज निगमने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला पण ती एवढ्यावर थांबली नाही आणि लागोपाठ इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आणि मेसेज करायला लागली. या कॉलच्या माध्यमातून तिने विप्रज आणि त्याच्या कुटुंबाला बदनाम करण्याची धमकी दिली. विप्राज म्हणाला की हे सर्व त्याचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या त्याचे खच्चीकरण करण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट आहे.
नगर कोतवाली येथे पोहोचलेल्या क्रिकेटरने सर्व प्रकार पोलीस स्थानकातील पोलिस निरीक्षक सुधीर कुमार सिंह यांना सांगितला. पोलिसांनी लगेचच ही शिक्षा गंभीरपणे घेतली. पोलिस निरीक्षक सुधीर कुमार सिंह म्हणाले की, डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. सायबर सेल कॉल डिटेल्स, मेसेजेस आणि संबंधित नंबर इत्यादींची तपासणी करत आहे.
विप्रज निगमने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कपिटल्ससाठी एकूण 14 सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 179.74 च्या स्ट्राईक रेटने 142 धावा केल्या. याशिवाय त्याने गोलंदाज म्हणून 11 विकेट सुद्धा घेतल्या. विप्रज निगम हा देशांतर्गत सामन्यात उत्तर प्रदेशसाठी खेळतो. त्याने 5 फर्स्ट क्लास आणि 6 लिस्ट ए सामने खेळले आहेत.
विप्रज निगमला कोण ब्लॅकमेल करत आहे?
विप्रज निगमने एका युवतीवर ब्लॅकमेल आणि बदनामीचा आरोप लावला आहे.
विप्रज निगमला कोणत्या प्रकारच्या धमक्या मिळत आहेत?
विप्रज निगमला आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आणि मेसेज करून बदनाम करण्याची धमकी दिली जात आहे.
विप्रज निगमने आयपीएल 2025 मध्ये काय प्रदर्शन केले आहे?
विप्रज निगमने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 14 सामने खेळले आणि 142 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.