इराण महिला फुटबॉल संघाचा मोठा निर्णय, सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास दिला नकार

AFC Women's Asian Cup 2026 : गोल्ड कोस्टच्या सीबस सुपर स्टेडियममध्ये एएफसी महिला आशिया कप 2026 स्पर्धेत इराण विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्यात सामना खेळवला गेला होता. रविवारी झालेल्या सामन्यापूर्वी इराणच्या संघाने राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला.   

पूजा पवार | Updated: Mar 3, 2026, 06:58 PM IST
इराण महिला फुटबॉल संघाचा मोठा निर्णय, सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास दिला नकार
Photo Credit - Social Media

AFC Women's Asian Cup 2026 : सध्या एएफसी महिला आशिया कप 2026 ही (Asia Cup 2026) फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी इराण आणि साऊथ कोरिया (Iran VS South Korea) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यापूर्वी इराणच्या राष्ट्रीय महिला संघाने त्यांच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी सायलेंट प्रोटेस्ट केला. गोल्ड कोस्टच्या सीबस सुपर स्टेडियममध्ये सामन्यापूर्वी इराणचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं होतं. मात्र यादरम्यान खेळाडू आणि इतर स्टाफने सामन्यापूर्वी देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं? 

इराण विरुद्ध दक्षिण कोरिया सामन्यापूर्वी खेळाडू राष्ट्रगीत गाण्यासाठी मैदानात आले. यावेळी जेव्हा इराणचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं तेव्हा इराणच्या कोणत्याही खेळाडू किंवा हेड कोच मरजियाह जाफरीने राष्ट्रगीत गायलं नाही. ते सर्व अगदी समोर पाहत होते. हा सायलेंट प्रोटेस्ट इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या इस्रायली आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ होता. रविवारी माध्यमांच्या प्रश्नांदरम्यान, इराणी कर्णधार झहरा घनबारी आणि जाफरी यांना खामेनी यांच्या मृत्यूबद्दल विचारण्यात आले, परंतु त्यांनी या प्रश्नांवर उत्तर देणं टाळलं. ईएसपीएननुसार जाफरीने फारसी भाषेत उत्तर दिलं होतं, मात्र एएफसी मीडिया प्रतिनिधिने कोणत्याही अनुवादाशिवाय जाफरीने दिलेलं उत्तराची क्लिप कापली. 

सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी हे इस्राईल आणि अमेरिका यांनी मिळून इराणवर केलेल्या हल्ल्यात मारले गेले. अयातुल्ला अली खामेनी यांच्या घरावर इस्राईल आणि अमेरिकेने जवळपास तीन बॉम्ब टाकले. इराणच्या महिला फुटबॉल संघाने हा सायलेंट प्रोटेस्ट इराणचे खामेनी यांच्या मृत्यूनंतर केला. 

पाहा व्हिडीओ : 

हेही वाचा : विराट - रोहित 'ऑन फादर्स ड्युटी', मैदानापासून दूर असलेले दिग्गज मुलांसोबत घालवतायत वेळ, Video Viral

दक्षिण कोरियाने जिंकला सामना : 

रविवारी इराण विरुद्ध दक्षिण कोरियामध्ये झालेला सामना हा दक्षिण कोरियाने जिंकला. 3-0 ने दक्षिण कोरियाने यात विजय मिळवला. इराण संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र इराण संघाची कोच जाफरी हे संघाच्या प्रयत्नांनी खुश होता. सामन्यानंतर तो म्हणाला, 'आम्हाला माहित होते की आमचा आगामी सामना कठीण असेल कारण कोरिया हा आशियातील सर्वात कठीण संघांपैकी एक आहे. ते खूप चांगले खेळले, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की आम्ही पुढील सामन्यात जोरदार पुनरागमन करू'.

इराणने आतापर्यंत स्पर्धेचे एकूण तीन सामने खेळले असून यात एक सामना हा ड्रॉ झाला तर दोन सामन्यात ते पराभूत झाले. याशिवाय 2026 मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांना दक्षिण कोरिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More