इरफान पठाणने केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली, शुभमननं द्विशतक ठोकल्यावर स्वतः करून दिली आठवण

IND VS ENG Test  : भारताचा कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या टेस्ट सामन्यात 269 धावांची कामगिरी केली. त्यानंतर त्याचं सर्व स्थरातून कौतुक होतं आहे.   

पुजा पवार | Updated: Jul 5, 2025, 03:03 PM IST
इरफान पठाणने केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली, शुभमननं द्विशतक ठोकल्यावर स्वतः करून दिली आठवण
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असलेला शुभमन गिल (Shubman Gill) तुफान फटकेबाजी करत संघासाठी धावा गोळा करताना दिसतोय. शुभमन गिलने पहिल्या टेस्ट सामन्यात शतक ठोकलं तर लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्याने द्विशतकीय खेळी केली. भारताचा टेस्ट कर्णधार म्हणून अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला तर यासह त्याने तब्बल 10 रेकॉर्डस् आपल्या नावावर केले. एजबेस्टनमध्ये गिलने 269 धावा केल्या त्यानंतर सर्व स्थरातून कौतुक होत असताना इरफान पठाणने केलेल्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यात इरफान पठाणनं 2019 रोजी भविष्यवाणी केली होती जेव्हा गिलने नुकतीच भारतीय संघातून खेळायला सुरुवात केली. 

काय म्हणाला होता इरफान पठाण? 

भारताचा माजी ऑल राउंडर इरफान पठाण यानं शुभमन गिलमधील टॅलेंट तेव्हाच हेरलं होतं जेव्हा त्याने आयपीएल 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून  खेळताना पंजाब किंग्स विरुद्ध 49 बॉलमध्ये संघासाठी 65 धावांची कामगिरी केली होती. या खेळीमुळे, गिलने एक असा खेळाडू म्हणून आपले स्थान निर्माण केले जो संघासाठी कठीण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चांगली फलंदाजी करू शकतो. गिलच्या या खेळीमुळे इरफान भलताच इम्प्रेस झाला होता. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, 'फक्त आताच नाही तर पुढे जाऊन सुद्धा हे नाव तुम्हाला सारखं ऐकायला मिळेल'. शुभमन गिलने दुसऱ्या सामन्यात द्विशतक ठोकल्यावर इरफान पठाणने पुन्हा एकदा त्याच्या 2019 रोजी केलेल्या ट्विटची आठवण करून दिली. 

gill

हेही वाचा : आय लव्ह यू जानू...., 4 लाख पोटगी मिळण्याचं नक्की झालं; हसीन जहां मोहम्मद शमी विषयी काय म्हणाली?

 

गिल भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला कर्णधार : 

शुभमन गिल (269) हा भारतीय कर्णधार म्हणून सामन्याच्या एका डावात सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी ही मोठी कामगिरी विराट कोहलीच्या नावावर नोंदली गेली होती. 2019 मध्ये पुणे टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून नाबाद 254 धावा काढल्या. तर शुभमन गिल हा भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक करणारा विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. किंग कोहलीने कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 254 धावा काढल्या होत्या. त्याच वेळी, गिलने आता इंग्लंडविरुद्ध कर्णधार म्हणून 269 धावांची खेळी केली आहे.