45 चेंडू, 6 षटकार... SRH च्या पहिल्याच सामन्यात ईशान किशनची शानदार खेळी, ठोकले ऐतिहासिक शतक

IPL 2025 Ishan Kishan: ईशान किशनने 45 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकार मारत 106 धावांची नाबाद शतकी खेळी केली.  

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 24, 2025, 08:37 AM IST
45 चेंडू, 6 षटकार... SRH च्या पहिल्याच सामन्यात ईशान किशनची शानदार खेळी, ठोकले ऐतिहासिक शतक
Ishan Kishan Hundred

SRH vs RR Highlights, IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) या नवीन सिजनमधील दुसरा सामना रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादमध्ये येथे खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा षटकार आणि चौकार ठोकत दमदार खेळी केली. यजमान सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनने शानदार शतक झळकावले. या शतकासह त्याने एक रेकॉर्डही केला आहे. 

सनरायझर्स हैदराबादकडून ईशानचे पदार्पण

आयपीएलमध्ये यंदा ईशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यातच ईशानने तुफानी फलंदाजीला सुरुवात केली.  किशनने अवघ्या 45 चेंडूत आपले शतक ठोकले. इशानचे आयपीएलमधील हे पहिले शतक आहे. ईशानला मुंबई इंडियन्सने गेल्या सिजनमध्ये सोडले आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

हे ही वाचा: कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला चाहता, विराटसमोर गेला अन्...पाहा VIDEO

 

ईशान किशनची दमदार खेळी 

रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ईशान तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला होता. नितीश रेड्डीसह किशनने संघासाठी पहिले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले.

हे ही वाचा: IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये पंचांना किती पगार मिळतो? एका सिजनची कमाई ऐकून बसेल धक्का!

 

हे ही वाचा: ‘गैरों के बिस्तर पे, अपनों का सोना देखा’, घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिले युझवेंद्र चहलच्या 'बेवफाई'चे संकेत!

'ही' कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज 

ईशान किशनने 45 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 106 धावांची नाबाद शतकी खेळी केली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक झळकावणारा ईशान आता आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पहिला फलंदाज ठरला आहे. यावेळी त्याने आरआरविरुद्ध एसआरएचसाठी सर्वाधिक धावा केल्या जाणाऱ्या मनीष पांडेचा विक्रम मोडला.