PSL Man Of the Match: जगात सध्या इंडियन प्रिमयर लीगची चर्चा सुरु आहे. पण पाकिस्तानमद्ये पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल 2025 फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. त्यामुळे आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी त्यांच्याकडे पीएसएल हा चांगला पर्याय आहे. पण पीएसएल खेळांडुच्या खेळीपेक्षा तिथे मिळणाऱ्या बक्षिसांमुळे चर्चेत आली आहे.
पीएसएलच्या एका मॅच सामन्यात कराची किंग्जला विजय मिळाला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जेम्स विन्सला मिळालेला पुरस्कार जगभरात चर्चेत आहे. त्याला हेअर ड्रायर हे बक्षिस म्हणून देण्यात आलं. हा सामना 12 एप्रिल रोजी मुलतान सुल्तान्स विरुद्धखेळला गेला. विन्सने शानदार शतक झळकावले आणि टीमला 4 विकेट्सनी विजय मिळवून दिला. त्याने फक्त 42 चेंडूत शतक पूर्ण केले. या कामगिरीनंतर, फ्रँचायझी मालकाने विन्सला 'सामन्यातील विश्वासार्ह खेळाडू' पुरस्कार म्हणून ड्रेसिंग रूममध्ये एक हेअर ड्रायर दिला.
James Vince's Instagram story. pic.twitter.com/IQ0DSOdSVt
—(@CallMeSher) April 14, 2025
कराची किंग्जने जेम्स विन्सला हेअर ड्रायर घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यावर खूप मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर जेम्स विन्सही स्वतःला रोखू शकला नाही. पुरस्कार मिळाल्यानंतर 2 दिवसांनी त्याने इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली. त्याने पुरस्कारांमध्ये मिळालेल्या हेअर ड्रायरचा आणि हॉटेलच्या हेअर ड्रायरचा फोटो शेअर केला. हा फोटो त्याने सर्वांना दाखवला. हा हेअर ड्रायर हॉटेलच्या हेअर ड्रायरपेक्षा चांगला असल्याचे त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीतून सांगितले. 'हे घ्या, हॉटेल ड्रायरकडून एक छान अपग्रेड' असे त्याने म्हटले.
त्या सामन्यात मुलतान सुल्तान्सने प्रथम फलंदाजी करत 234 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने शतक झळकले. त्याने 63 चेंडूत 105 धावा केल्या. यामध्ये नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. विन्सने 43 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने 4 चेंडू शिल्लक असताना संघाला लक्ष्यापर्यंत नेले. पाकिस्तानकडून खेळणाऱ्या खुसदिल शाहने त्याला चांगली साथ दिली. खुसदिलने 37 चेंडूत 60 धावांची धमाकेदार खेळी केली.
'लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होते. जेव्हा आम्ही फलंदाजी केली तेव्हा आम्हाला जाणवले की पीच किती चांगलं आहे', असे सामन्यानंतर जेम्स विन्स म्हणाला. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला सुरुवातीपासूनच धावगती कायम ठेवावी लागते. अनेक मोठे क्षण होते पण शेवटी मी विजय मिळवल्याचा आनंद झाल्याचेही त्याने पुढे सांगितले.