Jemimah Rodrigues breaks silence on allegations of 'conversion ceremony': महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जेमिमा रॉड्रिग्ज आता देशभरात चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तिच्या अविश्वसनीय खेळीने भारताला अशक्य वाटणारा टार्गेट गाठून दाखवला. पण आज जेमिमा जितक्या कौतुकात न्हाऊन निघते आहे, तितकंच गेल्या वर्षी तिचं आयुष्य वादांच्या भोवऱ्यात अडकलं होतं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत जेमिमाने नाबाद 127 धावा फटकावत भारतीय संघाला 339 धावांचा ऐतिहासिक पाठलाग यशस्वी करून दिला. तिच्या या धडाकेबाज इनिंगनं संपूर्ण सामन्याचा कल फिरवला आणि संपूर्ण ड्रेसिंग रूमला विश्वास दिला की विजय शक्य आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं.
2024 मध्ये जेमिमा रॉड्रिग्ज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली होती. मुंबईतील खार जिमखाना क्लबने तिची मेंबरशिप रद्द केली. तिच्या वडिलांवर इवान रोड्रिग्जवर ‘धर्मांतरणाच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग’ केल्याचा आरोप करण्यात आला होता. क्लबच्या मॅनेजमेंटने सांगितलं होतं की, जेमिमाच्या मेंबरशिपद्वारे कमी दरात हॉल बुक करून धार्मिक कार्यक्रम घेतले जात होते, जे क्लबच्या नियमांच्या विरोधात आहे.
आता, अनेक महिन्यांनंतर जेमिमाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाबद्दल प्रथमच उघड बोललं. ती म्हणाली, “घडलेलं सगळंच मला दुखावणारं होतं. माझ्याबद्दल लोक काय बोलतात ते मी समजू शकते, पण माझ्या आई-वडिलांना यात ओढलं गेलं, ते खूप वेदनादायक होतं. आम्ही जे काही केलं ते नियमांनुसारच होतं. याचे पुरावेही आमच्याकडे होते.”
जेमिमा पुढे म्हणाली, “हा सगळा प्रकार दुबई वर्ल्ड कपनंतरचा आहे. माझं प्रदर्शनही अपेक्षेप्रमाणे नव्हतं आणि मी आधीच मानसिकदृष्ट्या खालावलेली होते. त्यातच अचानक बातम्या, मेसेजेस आणि माझ्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद कमेंट्स पाहून मी पूर्णपणे कोसळले. माझा भाऊ फोनवर होता आणि मी रडतच बसले.”
विवाद उभा राहिल्यानंतर, जेमिमाचे वडील इवान रोड्रिग्ज यांनीही स्पष्ट केलं होतं की त्या कार्यक्रमांचा धर्मांतरणाशी काहीही संबंध नाही. सर्व कार्यक्रम जिमखानाच्या नियमानुसारच पार पडले होते.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.