)
IND VS AUS Semi Final : महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सेमी फायनलचा दुसरा सामना पार पडला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी तब्बल 339 धावांचं आव्हान दिलं होतं, हे आव्हान भारतीय महिला फलंदाजांनी 5 विकेट राखून पूर्ण केलं. यासह टीम इंडियाने फायनलमध्ये धडक दिलेली आहे. टीम इंडियाच्या (Team India) विजयात युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) हिचा मोठा सहभाग होता. तिने नाबाद 127 धावा करून भारताला फायनलचं तिकीट मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. मात्र या विजयानंतर जेमिमाने मागील काही महिन्यात तिच्या सोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला.
नवी मुंबईतील डिवाय पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा सेमी फायनल सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी 339 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान पूर्ण करण्यात जेमिमा रॉड्रिग्सने (नाबाद 127) आणि हरमनप्रीत कौरने (89) महत्वाची भूमिका बजावली. जेमिमा रॉड्रिग्सने 134 बॉलमध्ये नाबाद 127 धावा केल्या यादरम्यान तिने 14 चौकार ठोकले. 25 वर्षांच्या जेमिमाला विजयानंतर अश्रू अनावर झाले.
विजयानंतर जेमिमाला अश्रू अनावर झाले. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये प्रतिक्रिया देताना सुद्धा जेमिमा रडत होती. ती म्हणाली, 'भारताचा फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी जेमिमाने महत्वाची कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयानंतर तिने प्रतिक्रिया देत म्हटले, 'सर्वात प्रथम मी येशूचे आभार मानू इच्छिते. मी हे एकटं करू शकली नसती. मला माहित आहे की त्यांनी मला या कठीण काळातून बाहेर काढले आहे. मी माझ्या आईचे, माझ्या वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकाचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. गेले चार महिने खरोखर कठीण होते, पण ते स्वप्नासारखे वाटते आणि अद्याप पूर्णपणे खरे झालेले नाही'.
Jemimah Rodrigues you beauty Hats off to the resilience pic.twitter.com/YqMVdz0mjD
The King Kohli (THeGoatVirat) October 30, 2025
जेमिमा रॉड्रिग्सने यावेळी सांगितलं की तिला सामन्याच्या फक्त 5 मिनिटांपूर्वी समजलं की तिला नंबर 3 वर फलंदाजीसाठी उतरायचं आहे. जेमिमा म्हणाली, 'मला माहित नव्हते की मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. मी सामना सुरू करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी मला सांगण्यात आले की मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. हे माझ्याबद्दल नाही, मला भारतासाठी हा सामना जिंकायचा होता आणि तो त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवायचा होता'.
जेमिमा रॉड्रिग्सने म्हटले की, 'आजचा दिवस माझ्या अर्धशतकाबद्दल किंवा शतकाबद्दल नव्हता, तर तो भारताला विजयाकडे नेण्याबद्दल होता. आतापर्यंत जे काही घडले आहे ती यासाठीची तयारी होती. गेल्या वर्षी, मला या वर्ल्ड कपमधून वगळण्यात आले. मी चांगल्या फॉर्ममध्ये होते. पण एकामागून एक गोष्टी घडत राहिल्या आणि त्यावर माझे नियंत्रण नव्हते. या दरम्यान मी जवळजवळ दररोज रडले. मानसिकदृष्ट्या ठीक नसल्यामुळे, चिंतेतून जात होते. मला माहित होते की मला या सगळ्यातून बाहेर येऊन पुनरागमन करावे लागेल आणि देवाने प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली'.