Kho Kho World Cup 2025: आजपासून सुरु होणार खो-खो विश्वचषकाचा थरार, कुठे बघता येईल पहिला सामना लाईव्ह? जाणून घ्या

Kho Kho World Cup 2025 Schedule:  23  देशांच्या संघांसह पहिल्या खो खो विश्वचषक 2025 ची सुरुवात आज 13 जानेवारी 2025 पासून होत आहे. पहिलाच सामना भारताचा आहे. या सिजनचे सगळे सामने कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहू शकता हे जाणून घ्या.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 13, 2025, 11:35 AM IST
Kho Kho World Cup 2025: आजपासून सुरु होणार खो-खो विश्वचषकाचा थरार, कुठे बघता येईल पहिला सामना लाईव्ह? जाणून घ्या
Photo Credit: Instagram

Kho Kho World Cup 2025 Where to Watch: देशाच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर सभागृह रविवारी खो-खो विश्वचषक स्पर्धेत ( Where to watch kho kho world cup live streaming) सहभागी झालेल्या 23 देशांतील संघांच्या उपस्थितीने आनंदित झाले होते. 13 ते 19 जानेवारी दरम्यान पहिला वाहिला खो-खो विश्वचषक खेळवला जाणार आहे. यामध्ये 23  देशांचे संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन सर्व संघांच्या उपस्थितीत झाले. याशिवाय या उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक विविधेची एक नेत्रदीपक झलक बघायला मिळाली.  पारंपरिक भारतीय संगीताने सर्व परदेशी खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली. प्रत्येक देशाने ऐतिहासिक मेळाव्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 

Add Zee News as a Preferred Source

घेतला आदरातिथ्याचा अनुभव 

परदेशी संघांना भारताच्या भव्य आदरातिथ्याचा अनुभव घेता आला. त्याचवेळी परदेशी खेळाडूंनी आपल्या देशाची सांस्कृतिक झलक दाखवल्यामुळे कार्यक्रमात एक प्रकारची भव्यता आली. आफ्रिकन संघांनी केलेल्या युद्धाच्या नादाने पाहुण्या देशांचे मनोबल उंचावले, तर युरोपियन राष्ट्रांनी दाखवलेल्या नृत्यांच्या हालचालींमुळे उपस्थितांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे मैदानात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. 

हे ही वाचा: Rohit Sharma: रोहित शर्माने कोणाच्या सांगण्यावरून निवृत्ती घेतली नाही? जाणून घ्या

 

कशी असेल सांघाची रचना?

  • प्रत्येक संघात 15 खेळाडू संघात निवडले गेले आहेत त्यातील 12 मैदान खेळतील.
  • प्रत्येक संघात 12-12 खेळाडू मैदानावर असतात. यातील 9-9 खेळणारे आणि 3-3 एक्स्ट्रा खेळाडू असतील. 
  • सामन्यात, प्रत्येक संघाला प्रत्येकी 7 मिनिटांचे दोन डाव मिळतात. एका डावात डिफेन्स करावा लागतो आणि दुसऱ्या डावावर अटॅक करावे लागते.

हे ही वाचा: रोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा

 

स्पर्धा कधी सुरू होणार?

भारतात पहिल्यांदाच खो-खो विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारतीय पुरुष संघाचे सर्व सामने IST रात्री 8:15 वाजता सुरू होतील. त्याच वेळी, महिला संघाचे सर्व गट टप्प्यातील सामने संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील.

 

 

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट

कधी आणि कुठे बघता येतील सामने? 

खो-खो विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन समारंभ १३ जानेवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी मैदानावर होईल. त्यानंतर भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात उदघाटनीय सामना होईल. स्टार स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स एचडी १, स्टार स्पोर्ट्स फर्स्टवर सामन्यांचे थेट प्रसारण होणार आहे. देशभर दुरदर्शनवरूनही स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्याचवेळी डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुनही सामने दाखवण्यात येणार आहेत.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More