KKR चा घरच्या मैदानावर पराभव... IPL 2025 मध्ये RCB ची विजयी सुरुवात! कोहलीने मिळवला एकतर्फी विजय

KKR vs RCB IPL 2025: आयपीएलच्या नवीन सिजनमध्ये पहिला सामना पहिला सामना हा गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगला.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 23, 2025, 07:44 AM IST
KKR चा घरच्या मैदानावर पराभव...  IPL 2025 मध्ये RCB ची विजयी सुरुवात! कोहलीने मिळवला एकतर्फी विजय
Royal Challengers Bengaluru VS Kolkata Knight Riders

RCB vs KKR IPl 2025 Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने IPL 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीने घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला. विराट कोहली (नाबाद 59) आणि फिल सॉल्ट (56) यांच्या झंझावाती अर्धशतकांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करताना कोलकात्याला 20 षटकांत 174 धावांवर रोखले आणि त्यानंतर 16.2 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. चार षटकांत 29 धावा देत तीन बळी घेणाऱ्या आरसीबीच्या कृणाल पांड्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

कोलकाताविरुद्ध ३ वर्षांनंतर पहिला विजय

बेंगळुरूला कोलकाताविरुद्ध ३ वर्षांनंतर पहिला विजय मिळाला आहे. यापूर्वी 2022 च्या सिजनमध्ये आरसीबीने केकेआरचा पराभव केला होता. 175 धावांचा पाठलाग करताना सॉल्ट आणि कोहलीने पहिल्या 6 षटकात 80 धावा केल्या. या दोघांनी केवळ 8.3 षटकांत 95 धावांची सलामी दिली. सॉल्टने 31 चेंडूत 180 च्या स्ट्राईक रेटने 56 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

 हे ही वाचा: Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!

 

कोहलीचा 400 वा सामना 

 कोहलीने आपल्या 400 व्या T-20 सामन्यात 163 च्या स्ट्राइक रेटने 36 चेंडूत 59 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार रजत पाटीदारनेही 16 चेंडूत 34 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला.

हे ही वाचा: ‘गैरों के बिस्तर पे, अपनों का सोना देखा’, घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिले युझवेंद्र चहलच्या 'बेवफाई'चे संकेत!

 

अजिंक्य रहाणेचे कर्णधारपद 

यंदा कोलकाता नाईट रायडर्सची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे.  केकेआरच्या अजिंक्यने चांगली सुरुवात केली आणि 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 2016 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळलेल्या 36 वर्षीय अनुभवी रहाणेला श्रेयस अय्यरच्या जागी केकेआरचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याने 31 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली.