IPL 2025 : भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) हा आयपीएल 2025 मध्ये धावांचा पाऊस पाडतोय. नव्या सीजनमधील 4 सामन्यांमध्ये केएल राहुलने 200 पार धावसंख्या केली असून आरसीबी विरुद्ध त्याने 93 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये धावांचा धुराळा उडवणाऱ्या केएल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्या सोबत ठाण्यात 7 एकर जमीन खरेदी केली आहे. भारतात प्रॉपर्टीचा डाटा ठेवणारी कंपनी 'स्क्वायर यार्ड्स' यांनी ही माहिती दिली असून ही जमीन मार्च 2025 मध्ये खरेदी केली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल हा बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा जावई आहे. अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने 2023 मध्ये केएल राहुलशी लग्न केले होते. अथियाने मार्च 2025 मध्ये महिन्याच्या अखेरीस गोंडस मुलगीला जन्म दिला. पश्चिम ठाण्यातील घोडबंदर रोड जवळील ओवळा क्षेत्रात राहुल आणि सुनील शेट्टीने 7 एकर जमीन घेतलीये. या जमिनीच्या खरेदीसाठी त्यांनी 9.85 कोटी रुपये मोजले असून या जमीन खरेदीच्या व्यवहारावर त्यांनी 68.96 लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार रुपये खर्च केलेत.
हेही वाचा : IPL 2025 सुरु असताना अर्जुन तेंडुलकरने चाहत्यांना केलं भावनिक आवाहन, सोशल मीडियावर केली पोस्ट
घोडबंदर रोड जवळील हे क्षेत्र मुंबई, ठाणे आणि पश्चिम क्षेत्रातील विभागांमध्ये बिझनेसच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी यांनी गेल्या वर्षी वांद्रेच्या पाली हिलच्या सँडहू पॅलेस येथे 3,350 चौरस फूट लक्झरी अपार्टमेंट विकत घेतले होते, ज्याची किंमत ही 20 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले गेले होते. यश अपार्टमेंटमध्ये चार पार्किंग स्लॉट सुद्धा त्यांना मिळालेत. या आलिशान अपार्टमेंटच्या खरेदीवर राहुल-एथियाला 1.20 कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागली होती.
केएल राहुल मागील तीन वर्ष लखनऊ सुपरजाएंट्सचा कर्णधार होता. मात्र मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिटेन करण्यात आले नाही आणि परिणामी तो ऑक्शनमध्ये आला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्याला 14 कोटींना करारबद्ध केले. आतापर्यंत राहुलने नव्या सीजनमध्ये 4 सामने खेळले असून यात 200 हुन अधिक धावसंख्या केलीये. केएल राहुल या स्पर्धेत 164 च्या स्ट्राइक रेटने खेळत असून त्याने या सामन्यात 2 वेळा अर्धशतक झळकावले. सध्या राहुल हा या सीजनमध्ये दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.