मॅच जिंकल्यावर केएल राहुलने संजय गोएंकांना केलं इग्नोर, पाहताच तोंड फिरवलं Video Viral

DC VS LSG : दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुल याने नाबाद अर्धशतक ठोकलं आणि यासह संघाला विजय मिळवून दिला. याविजयानंतर केएल राहुलसोबत हस्तांदोलन करण्यासाठी लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका पुढे आले मात्र यावेळी राहुलने त्यांना पाहून तोंड फिरवलं. 

पुजा पवार | Updated: Apr 23, 2025, 10:14 AM IST
मॅच जिंकल्यावर केएल राहुलने संजय गोएंकांना केलं इग्नोर, पाहताच तोंड फिरवलं Video Viral
(Photo Credit : Social Media)

DC VS LSG : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Delhi Capitals VS Lucknow Super Giants) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट्सने सामना जिंकून लखनऊवर विजय मिळवला. यासह त्यांनी पॉईंट्स टेबलमधील दुसरं स्थान 12 पॉईंट्स मिळवत अधिक पक्कं केलं. यात दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने नाबाद अर्धशतक ठोकलं आणि यासह संघाला विजय मिळवून दिला. याविजयानंतर केएल राहुलसोबत हस्तांदोलन करण्यासाठी लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका पुढे आले मात्र यावेळी राहुलने त्यांना पाहून तोंड फिरवलं. 

लखनऊचं होम ग्राउंडवर असणाऱ्या एकना स्टेडियमवर मंगळवारी पार पडलेल्या सामन्याचा टॉस दिल्ली कॅपिटल्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सने फलंदाजी करून 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. तर लखनऊला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करताना दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेलने 51, करूण नायरने 15 तर केएल राहुल नाबाद 57 आणि अक्षर पटेलने नाबाद 34 धावा केल्या. 

हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack : भारतीय क्रिकेटर्सची हळहळ अन् संताप! थेट इशारा देत म्हणाले, 'याची किंमत...'

 

केएल राहुलची तुफान फटकेबाजी : 

केएल राहुल याने फलंदाजी करताना 47 बॉलमध्ये 57 धावा केलेल्या. या दरम्यान त्याने 3 षटकार आणि 3 चौकार लगावले. केएल राहुलचे आयपीएलमधील 40 वे अर्धशतक होते. केएल राहुलने संघासाठी विजयी खेळी केली. यानंतर त्याने मैदानात खास सेलिब्रेशन सुद्धा केले. सामना जिंकल्यावर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत होते. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका मैदानात आले आणि त्यांनी केएल राहुलशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला आणि ते राहुलशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र राहुलने कसं बसं त्यांच्यासोबत हात मिळवला आणि तिथे न थांबता त्यांना इग्नोर करून निघून गेला. यावेळी संजीव गोएंका यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. 

पाहा व्हिडीओ : 

केएल राहुलचा केला होता अपमान :

आयपीएलचे मागील तीन सीजन केएल राहुल हा लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार होता. आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात लखनऊच्या संघाचा एकना स्टेडियमवर पराभव झाला. यामुळे त्यांची प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्याची संधी हुकली. याचा राग अनावर होऊन लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी भर मैदानात ऑन कॅमेरा संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलला झापलं. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि केएल राहुलच्या चाहत्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. लखनऊ सुपर जाएंट्सने आयपीएल 2025 पूर्वी केएल राहुलला रिटेन केलं नाही, त्यामुळे त्याला ऑक्शनमध्ये यावं लागलं. मेगा ऑक्शनमध्ये केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटींना विकत घेतलं.