)
KL Rahul Performs Whistle Celebration in IND Vs WI 1st Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत- वेस्ट इंडिज मालिकेतील पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेर भारताने ३ बाद २१८ धावा करत ५८ धावांची आघाडी घेतली होती. मात्र या सत्रात सर्वाधिक चर्चेत राहिला तो भारतीय सलामीवीर के.एल. राहुलचा शानदार शतकाचा क्षण.
राहुलने १९० चेंडूत कसून खेळत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, हे त्याचे भारतातील जवळपास ९ वर्षांनंतर आलेले शतक होते. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने १९९ धावांची खेळी केली होती, तेव्हा तो शतक नंतर २०० च्या उंबरठ्यावर बाद झाला होता. त्यानंतर अनेक वेळा अर्धशतके झळकावूनही शतक हुकत होते. शेवटी वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पहिल्या टेस्टमध्ये त्याने ती उणीव भरून काढली.
शतक पूर्ण होताच राहुलने चाहत्यांना एक अनोखी भेट दिली. त्याने बॅट उंचावत, ओठांवर बोट ठेवून शिट्टी वाजवण्याचा ‘व्हिसल सेलिब्रेशन’ केला. त्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी त्याच्या या सेलिब्रेशनला प्रचंड प्रतिसाद दिला असून, बर्याच जणांनी त्याला त्याच्या धैर्याचे आणि संयमाचे प्रतीक ठरवले आहे.
EMOTIONAL CELEBRATION BY KL RAHUL...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 3, 2025
- The best Test Opener Currently in Cricket. pic.twitter.com/hzxXAkzT3C
२०२५ या कॅलेंडर वर्षात राहुलचे हे तिसरे शतक ठरले. याआधी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली होती. यामुळे या वर्षातील त्याच्या एकूण धावसंख्येचा आकडा ६४९ वर पोहोचला आहे. त्याची सरासरी ५४.०८ इतकी प्रभावी आहे आणि त्याच्या नावावर तीन शतके तसेच दोन अर्धशतके जमा झाली आहेत.
Test hundred No. for KL Rahul
— BCCI (@BCCI) October 3, 2025
The opener continues his sublime form #TeamIndia have gone past 200 runs.
Updates https://t.co/MNXdZcelkD#INDvWI | @IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/c69vJbFFVD
राहुलच्या या दमदार खेळीमुळे भारताने सामना आपल्या पकडीत आणला आहे. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर घरच्या मैदानावर शतक झळकावत त्याने केवळ स्वतःवरील दबाव कमी केला नाही, तर संघालाही स्थिरता दिली आहे. या खेळीने तो पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक ठरला आहे.